शिंदेंच्या 500 कोटींच्या आरोपांवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांच्या जवळच्या नेत्याने थेट निकाल लावला, दिलं नवं आव्हान
आज राज्यात अनेक दसरा मेळावे पार पडले, आणखी दोन मुंबईतील शिवसेनेचे मेळावे पार पडायचे आहेत. पण नारायणगडावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. आता भाजपची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

श्री क्षेत्र नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. जरांगे पाटील यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी मला 500 कोटी रुपये दिले असल्याचं भाजपला सांगितलं आहे, त्यांच्या या दाव्यानंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी आता भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपचे नेते आणि संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीष महाजन यांनी जरांगेंचे आरोप कोणालाही पचणार नाहीत, असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले महाजन?
जरांगेंच्या या आरोपांमुळे आमच्यामध्ये कुठे वाद किंवा मतभेद होतील, असा कुठलाही प्रश्न नाही. आमच्या सर्व आलबेल चालले आहे. जरांगे पाटलांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. त्यांचं त्यांच्या समाजाला आरक्षण देण्याचं काम आहे त्यांनी ते करावं. उगाच अशा पद्धतीचे वक्तव्य करून आमच्या दोन पक्षांमध्ये मत मतांतरे मतभेद तयार करायचे, मात्र त्यातून काही होणार नाही. अशा पद्धतीचे वक्तव्य करून आमच्यामध्ये कोणी एकमेकांना संपवायला निघालेले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी काय असतील ते पुरावे द्यावेत, या संदर्भातला खुलासा एकनाथ शिंदे साहेब मेळाव्याच्या माध्यमातून करतीलच, असं महाजनांनी केलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याला कुठलाही अर्थ नाही किंवा तथ्य नाही असं कुठेही झालेलं नाही. भाजपबद्दल बोलले म्हणून मी बोलतो आहे. मात्र त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा नाम उल्लेख केला आहे, त्यामुळे आहे त्याचा सविस्तर खुलासा एकनाथ शिंदे साहेब हे करतीलच. असंच स्पष्टीकरण भाजपच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक म्हणून सुरुवात केलेले जरांगे पाटील हे आजघडली राज्यातील मराठ्यांचे मोठे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा आमरण उपोषणांचं हत्यार उपसलं. त्यानंतर अनेकदा सरकारने आश्वासनं दिली आणि आंदोलनं संपली. मुंबईतील आझाद मैदानावरील त्यांच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यापूर्वीही त्यांनी मराठ्यांना घेऊन मुंबईकडे कुच केली होती. पण वाशी नाक्यावरुने ते समस्त मराठा बांधवांसोबत माघारी निघाले होते. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत आणि जरांगेंनीही त्याला होकार देत गुलाल उधळला होता.