AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाहूबाजूंनी घेरल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची तातडीची पत्रकार परिषद, म्हणाले…

Pune Bus Rape Case: स्वारगेटला गेल्यावर मला लक्षात आले की त्या ठिकाणी प्रचंड रहदारी आहे. नेहमी वर्दळ असणारी ती जागा आहे. त्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणी त्या बहिणीला वाचवण्यासाठी का गेले नाही? हा प्रश्न मला पडला.

चाहूबाजूंनी घेरल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची तातडीची पत्रकार परिषद, म्हणाले...
योगेश कदमImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 01, 2025 | 10:37 AM
Share

Pune Bus Rape Case Yogesh kadam: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ती पीडित तरुणी ओरडली का नाही? असा प्रश्न योगेश कदम यांनी उपस्थित केल्यावर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मंत्र्यांना संवेदनशील प्रकरणात बोलताना जपून वक्तव्य करण्याचे म्हटले आहे. तसेच योगेश कदम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपले नेमके वक्तव्य काय होते? आपला हेतू काय होता? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

योगेश कदम काय म्हणाले

आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मी प्रत्येक बैठकीत कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे योगेश कदम यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, स्वारगेटला गेल्यावर मला लक्षात आले की त्या ठिकाणी प्रचंड रहदारी आहे. नेहमी वर्दळ असणारी ती जागा आहे. त्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणी त्या बहिणीला वाचवण्यासाठी का गेले नाही? हा प्रश्न मला पडला. तो प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिसांनी दिलेले उत्तर मी माध्यमांना दिले.

योगेश कदम म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करुन राजकारणासाठी वापर करत आहे. आमच्या सरकारची पॉलीसी महिलांच्या अत्याचाराबाबत झीरो टॉरलन्स आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मी सांगितले. त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. उलट आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा दोन दिवस अथक काम करत होती. त्यांना यश आले आहे. आता आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे आमचे प्रयत्न आहे. मी माझा उद्देश स्पष्ट केला आहे. त्यावरुन कोणी राजकारण करु नये, असे योगेश कदम यांनी म्हटले.

हे ही वाचा…

मंत्री सावकारे, योगेश कदम यांना घरचा आहेर, शिवसेनेतील या बड्या नेत्याने सुनावले

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.