Gauri Garje Case : पत्नी गौरीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेचा पंकजा मुंडेंना फोन अन्.., मोठी माहिती समोर
एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, यावर आता पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली आहे, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात गौरी पालवे यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेत मृत गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
‘काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वा. सुमारास माझा पी ए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पी ए च्या फोनवर आला . तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खुप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसुर राहु नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजु शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे.अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे.’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेच्या पत्नी, डॉक्डर गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली आहे, तणावात येऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. त्यांनी मुंबईतील राहत्या घरी आपलं जीवन संपवलं. गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सातत्यानं भांडणं होत होती अशी माहिती देखील आता समोर येत आहे.
