गणपत गायकवाड, महेश गायकवाड यांच्यातील वाद सोशल मीडियावर, वादात नेटीजन्सची उडी

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडली आहे. आता हा वाद सोशल मीडियावर सुरु झाला आहे. यासंदर्भात रिल्स व्हायरल होत आहे.

गणपत गायकवाड, महेश गायकवाड यांच्यातील वाद सोशल मीडियावर, वादात नेटीजन्सची उडी
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 12:12 PM

सुनील जाधव, ठाणे, दि. 5 फेब्रुवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादाची चर्चा आता राज्यभर सुरु आहे. एका जागेवरुन दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे आमदार गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता दोघांमधील वाद सोशल मीडियावर तापू लागला आहे. त्यांच्यासंदर्भातील रिल्स व्हायरल झाले आहेत. दोघांचे समर्थक त्यांचा उदोउदो करणारे रिल्स तयार करुन व्हायरल करत आहे.

सोशल मीडियावर वातावरण तापले

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. कल्याण, डोंबिवलीमधील राजकारण तापले आहे. त्याचबरोबर नेटीजन्स आक्रमक झाले आहेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांचे समर्थक रिल्स करुन सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड समर्थकांकडून पाठिंबा देणारे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकमेकांना आवाहन प्रति-आव्हान देणारे हे रिल्स व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर वातावरण तापू लागले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत रिल्समध्ये

गणपत गायकवाड यांच्या रिल्समध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाषण घेतले आहे. फडणवीस म्हणतात, हम छेडते नही, और छेडा तो छोडते नही….तर महेश गायकवाड यांच्या रिल्समध्ये जनता आहे पाठिशी…टायगर अभी जिंदा है…शेर का शिकार नही किया जाता…असे संदर्भ वापरण्यात आले आहेत. यामुळे सोशल मीडियावरील राजकारण तापले आहे.

अडीच तास केली चौकशी

कळवा पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि इतर दोन साथीदारांची चौकशी क्राइम ब्रँचच्या पथकाकडून सुरु झाली आहे. कळवा पोलीस ठाण्यातील क्राईम ब्रँचचे पथक ही चौकशी करत आहे. या पथकाने गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांची अडीच तास चौकशी केली. या चौकशीत अनेक प्रश्न विचारण्यात आले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.