AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपू्र्ण मुंब्रा हिरवा करू… सहर शेख विधानावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट..

मुंब्रातील एमआयएमची नगसेविका सहर शेख हिने निवडून आल्यानंतर थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधत थेट टीका केली होती. यासोबतच संपूर्ण मुंबा हिरवा करण्याचा दावाही तिने केला होता. यावर आता जितेंद्र आव्हाड थेट पहिल्यांदाच बोलताना दिसले आहेत.

संपू्र्ण मुंब्रा हिरवा करू... सहर शेख विधानावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट..
Jitendra Awhad and Sahar Sheikh
| Edited By: | Updated on: Jan 28, 2026 | 7:47 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून अनेक प्रस्थापितांना मोठे धक्के बसले. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्रा प्रचंड चर्चेत आला. मुंब्रा हा कायमच आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत मुंब्रात एमआयएमची एन्ट्री झाल्याचे बघायला मिळाली. एमआयएमकडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या सहर शेख हिने थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचत थेट नक्कल केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असेही तिने थेट म्हटल्याने एकच खळबळ उडाली. अनेकांनी सहर शेखवर टीका केली. तिकिट मागूनही जितेंद्र आव्हाडांकडून शेवटपर्यंत आम्हाला तिकिट दिले नसल्याचा दावा तिने केला. सहर शेखने केलेल्या नकलेवर जितेंद्र आव्हाड नक्की काय उत्तर देतात, याकडे राज्याच्या नजरा होत्या. शेवटी जितेंद्र आव्हाड यांनी थेट मोठे विधान केले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेल्या 8 ते 10 दिवस मुब्र्यांची खूप चर्चा सुरु आहे. स्वतंत्र मिळाल्यानंतर एक गाणं आठवत.. हम लाये है तुफान से कष्टी निकाल के इस मुंब्रा को बचा कर रखे.. इस मुंब्रा को हमेशा बदनाम किया गया है… कधी RDX तर कधी मर्डरच्या केसमध्ये. महाराष्ट्रातील मुंब्रा येथे राहणाऱ्या लोकांना माहिती नाही की, महात्मा गांधी गेलेला मार्ग मुंब्रा आहे. महात्मा गांधींचे चरणस्पर्श झालेले हे शहर युद्धाचे नव्हे तर शांतीचे ठिकाण असेल. मुंब्राचा रंग कायमच तिरंग्याचा राहणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावून सांगितले.

मला धमकी देण्याच्या घरचा दरवाजा वाजवला तर त्याचे वडील मला जेवायला देतील… मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.. मी घाबरत असतो तर RSS वर बोललो नसतो.. लहानपणापासूनच मारामारी सगळ पाहिले आहे. कोणी सागितलं मुंब्रात येऊन दाखव अस सागितलं म्हणून मुंब्रात आलो. माझ्यावर या शहराने प्रेम केले आहे. मी चालत गेलो तरी मोर्चा निघतो.

मी शांत आहे… शांत राहू दया… अन्यथा काही लोकांची झोप उडेल.. माझं तोड उघडू देऊ नका नाही तर काही लोक जेल मध्ये जातील..  पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मी काम केलं म्हणून निवडून मोठ्या मताने आलो.. काही माझे मित्र हरले मात्र त्याची लढाई आता सुरू झाली आहे.. चॉकलेट खायला दिल असे आमचे लोक बोलणार नाही.. मात्र लहान मुलीला काही बोलले तर माफ करा .., असे म्हणत थेट जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेखला टोला लगावला.

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले,  40 लोक तिकीट मागत होते म्हणून.. तिकीट दिले नाही .. मी प्रेमाने जिंकेल हे शहर.. माझं हिंदू मुस्लिम मनात नाही मी माणुसकीला मानतो.. मी कोणाला दुश्मन मानत नाही म्हणून मी कोणाला उत्तर देणार नाही .. त्याची औकात ही नाही. या शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे या शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्काराची ओळख आहे हे शहर जात धर्म भाषा याच्या पलीकडचा जाऊन विचार करत म्हणून हे शहर एक आहे, असेही त्यांनी म्हटले.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.