AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेससोबत जाण्यासाठीची जबाबदारी सोपवली होती; राज ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट

राज ठाकरे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेससोबत जाण्यासाठीची जबाबदारी सोपवली होती; राज ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट
राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत गौप्यस्फोट
| Updated on: Nov 11, 2024 | 6:18 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या याबाबत राज ठाकरे यांनी नवीन दावे केले आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. या तीनही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारवर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार स्थापन करण्यासाठी तत्कालीन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष मुलाखतीत केला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना मविआचं सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री करणार, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

“काँग्रेससोबत जाण्यासाठी सर्व गोष्टी एकनाथ शिंदे यांना करायला सांगितल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे त्यांना सांगितलं होतं. नंतर स्वत: बसले. जे केलं ते स्वार्थासाठी केलं. साधी गोष्ट लक्षात घ्या. काँग्रेस एनसीपीच्या विरोधात आजपर्यंत निवडणुका लढवल्या. अचानक उठता आणि त्यांच्यासोबत जाऊन बसता. लोकांनी तुम्हाला भाजप शिवसेना म्हणून मतदान केलं. तुम्ही काँग्रेससोबत जाता ही प्रतारणा नाही का? तुम्ही तटस्थ राहायला हवं होतं”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

‘भाजप माझी भाषा बोलतो असं म्हणा ना’

राज ठाकरे यांना भाजपची भूमिका आणि आपली भूमिका जवळपास सारखी असल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. “एक गोष्ट आहे त्यात समान बघणार असाल तर ती बाहेर येणार ना. त्यातून वेगळी काय येणार आहे. भाजप माझी भाषा बोलतो असं म्हणा ना. तुम्ही आणि मी या पुतळ्याकडे बघतो. तेव्हा मी म्हटलं अरे शिवाजी महाराज आहे. तुम्ही म्हणाल शिवाजी महाराज आहे. त्याला तुम्ही माझी भाषा बोलता असं म्हणाल का?”, असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.