AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkey vs dogs : 250 पेक्षा जास्त कुत्र्यांना मारणाऱ्या त्या माकडाला अखेर अटक, बदल्याची सुरूवात कशी झाली? वाचा सविस्तर

इतिहासातल्या या सर्वात मोठ्या बदल्याची सुरूवात झाली, एका वाईट घटनेने. आधी कुत्र्यांच्या एका टोळीने माकडांच्या एका पिल्लाला मारले, त्यानंतर माकडांनीही बदला घ्यायचा ठरवला आणि त्याच बदल्यातून त्यांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लांना मारले आहे.

Monkey vs dogs : 250 पेक्षा जास्त कुत्र्यांना मारणाऱ्या त्या माकडाला अखेर अटक, बदल्याची सुरूवात कशी झाली? वाचा सविस्तर
कुत्र्याची पिल्लं पळवणारं वानर
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 4:39 PM
Share

बीड : बीडमधील एका गावात मागील चार महिन्यांपासून माकडांनी धुमाकूळ घातला होता. या माकडांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लाला मारले आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी माकडांचे आणि कुत्र्यांचे जणू टोळीयुद्ध सुरू आहे. या टोळीयुद्धाची देशभर चर्चा सुरू आहे. यात माकडांनी कुत्र्यांच्या पिल्लांना उंच ठिकाणी नेऊन वरतून खाली फेकले आहे. यामुळे या परिसरात कुत्री दिसेना झाली आहे.

बदल्याची सुरूवात कशी झाली?

इतिहासातल्या या सर्वात मोठ्या बदल्याची सुरूवात झाली, एका वाईट घटनेने. आधी कुत्र्यांच्या एका टोळीने माकडांच्या एका पिल्लाला मारले, त्यानंतर माकडांनीही बदला घ्यायचा ठरवला आणि त्याच बदल्यातून त्यांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लांना मारले आहे. त्यानंतर गावातही दहशतीचे वातावरण पसरले होते. पहिल्यांदा वनविभागाने प्रयत्न करूनही त्यांना माकडांना पकडण्यात यश आले नव्हते मात्र, आता काही माकडांना पकडण्यात यश आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

दोन माकडांना अटक

कुत्र्यांना मारणाऱ्या दोन माकडांना पकडल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यांना नंतर जंगलात सोडण्यात येणार आहे. शेतात फळे खाण्यासाठी आलेली माकडं त्यांच्या पिल्लाला मारल्याने हिंसक झाली आणि सुरू झाले सर्वात मोठी टोळीयुद्ध. सुरूवातील गावकऱ्यांनी माकडांचा पाठलाग करून कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, माकडे कुत्र्यांना उच्च ठिकाणी आणि झाडावर नेत असल्याने त्यांना वाचवणे शक्य होईना. गावकऱ्यांनी वापरलेला दगडफेकीचा पर्यायही माकडांपुढे फेल ठरला. काही गावकऱ्यांवरही माकडांनी हल्ले केले आहेत, त्यामळेच गावकऱ्यांनी शेवटी कंटाळून वनविभागाला बोलवले आणि त्यानंतरच या माकडांना पकडण्यात आले आहे.

No water in Nashik| नाशिकमध्ये बुधवारी कोणत्या भागात पाणीपुरवठा नाही, घ्या जाणून…

Malala Yousafzai Video : हसन मिनाझला अनफॉलो करावं का? दाढी काढली तर..? पती असरसोबत मलालाचा नववर्षाचा अनोखा खेळ

Bigg Boss Marathi 3 | सोनाली पाटीलनंतर ‘बिग बॉस मराठी’तून आणखी एका स्पर्धकाचे एलिमिनेशन

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.