AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामनवमीच्या मुहूर्तावर महिलेच्या आयुष्यात घडली अनोखी घटना… तिची 8 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली

रामनवमीचा उत्साह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करतात. अशात रामनवमीच्या मुहूर्तावर अशी घटना घडली ज्यामुळे समस्त कुटुंबियांमध्येत उत्साहाचं वातावरण होतं... रामनवमीच्या दिवशी महिलेची अखेर 8 वर्षांचा प्रतीक्षा संपली आहे...

रामनवमीच्या मुहूर्तावर महिलेच्या आयुष्यात घडली अनोखी घटना... तिची 8 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली
AI Image
| Updated on: Mar 27, 2026 | 11:31 AM
Share

धुळे जिल्ह्यातील शिरपूरातून एक आनंददायी आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे…रामनवमीच्या शुभदिनी एका मातेनं एकाच वेळी तीन गोंडस बाळांना जन्म दिला आहे…विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी या दाम्पत्याच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला असून, सध्या आई आणि तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर आहे. शिरपूर शहरातील आदिशक्ती या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया न करता नैसर्गिक अनोखी प्रसूती पार पडली, मध्यप्रदेशातील आमल्यपाणी येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय संगिता विश्राम पावरा यांना रामनवमीच्या दिवशी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.

त्याच दिवशी त्यांची यशस्वी प्रसूती झाली. यावेळी त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन बाळांना जन्म दिला. या तिन्ही बाळांच्या जन्मामध्ये अवघ्या एका मिनिटाचे अंतर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे तिन्ही बाळं मुलं असून आईसह सर्वांची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. ही प्रसूती संगिता पावरा यांची पहिलीच असून, लग्नानंतर आठ वर्षांनी त्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे… एकाच वेळी तीन बाळांच्या आगमनाने पावरा कुटुंबात आनंदाचा उत्सव साजरा केला जात आहे.

आदिशक्ती रुग्णालाच्या डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, ‘तीन बाळ असलेली डिलिव्हरी होणं फार अवघड असतं. अशी डिलिव्हरी काळजी आणि देखरेखीखाली करण्यात येते… कदाचित शिरपूर येथे ही पहिलीच डिलिव्हरी असेल. जी सी – सेक्शनने न होता नॉर्मल झाली आहे. आमच्यासाठी देखील हा एक इतिहास आहे.’

डॉक्टर पुढे म्हणाले,  ‘एकाच वेळी तीन बाळांची डिलिव्हरी मोठी रिस्क असते. अशात महिलेची पहिलीच डिलिव्हरी होती. पहिल्यांचा महिला रुग्णालयात आली तेव्हा तिच्या शरीरात फक्त 4 – 5 ग्रॅम रक्त होतं. तिचे हात – पाय देखील खूप जास्त सुजलेले होते. त्यानंतर दिलेल्या वेळेत त्या रुग्णालयात आल्या. त्यामुळे पेशेंट आणि नातेवाईकांचं देखील कौतुक करायला पाहिजे. पेशेंट सुशिक्षित नसले तरी, त्यांना योग्या मार्गदर्शन केल्यानंतर ते देखील स्वतःची काळजी घेतात आणि उपचार घेतात.’

महिलेचं आणि कुटुंबियांचं देखील डॉक्टरांनी कौतुक केलं. ‘महिला नचूकता रुग्णालयात येत होती. बीपी खूप जास्त वाढल्यामुळे त्यांना गोळ्या सुरु केलेल्या. त्यानंतर आठ दिवसांत महिलेची प्रकृती स्थिर झाली. म्हणून त्यांचा विश्वास आमच्यावर बसला. आम्ही आईसह तीन बाळांना वाचवण्याची शाश्वती त्यांना दिलेली. याच विश्वासावर त्या रुग्णालयात येत होत्या आणि आज (शुक्रवार) सकाळी 7 वाजता महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आता महिलेसह तीनही बाळांची प्रकृती स्थिर आहे… असं देखील डॉक्टर म्हणाले.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....