AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय निर्णय घेण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर भावूक, तो फोटो केला शेअर, दोन ओळीतच..

ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निर्णय कालच कोर्टाने दिला. ज्यानतंर ओमराजे निंबाळकर यांना धक्का बसला. दरम्यानच ओमराजे निंबाळकर भावनिक झाल्याचे बघायला मिळतंय.

राजकीय निर्णय घेण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर भावूक, तो फोटो केला शेअर, दोन ओळीतच..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 21, 2026 | 1:48 PM
Share

शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी करत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी फूट ठाकरेंच्या पक्षात पाडली. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर यासारख्या बड्या नेत्यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकल्याने मोठा धक्का बसला. खासदारांची मनधरणी सुरू आहे. कालच ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल काल लागला. या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. यानंतर ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज ओमराजे निंबाळकर निर्णय घेणार आहेत. यादरम्यानच आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला, ज्यात वडिलांसोबतचा एक जुना फोटोही दिसत आहे.

यासोबतच त्यांनी कवितेतील काही महत्वपूर्ण ओळी लिहिल्या. भोवताली दाटला अंधार दु:खांचा जरी.. सुर्य सत्याचा उद्या उगवेल खात्री आहे… या अगदी मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. कालच पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला आणि आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. यादरम्यान ओमराजे निंबाळकर भावूक झाल्याचे दिसत आहेत.

आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली. मात्र, त्यांनी अद्यापही आपला राजकीय निर्णय जाहीर केला नाही. 20 वर्षांपासून माझे कुटुंब न्यायसाठी संघर्ष करत आहे. मी दिल्लीच्या कोर्टात हे प्रकरण घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षा ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला होती. मात्र, पुराव्याअभावी त्यांच्या बाजूने निकाल लागलाच नाही. यादरम्यानच आज ओमराजे निंबाळकर सायंकाळपर्यंत आपला राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. धाराशिवकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती