AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज ठाकरेंना आणखी एका खासदाराचं खुलं आव्हान, म्हणाले तुमच्यात हिंमत असेल तर…

राज ठाकरे यांना आणखी एका खासदाराने खुलं आव्हान दिलं आहे. गरीब हिंदी लोकांविरोधात गुंडगिरी करू नका, असा सल्ला या खासदाराने राज ठाकरे यांना दिलाय.

मोठी बातमी! राज ठाकरेंना आणखी एका खासदाराचं खुलं आव्हान, म्हणाले तुमच्यात हिंमत असेल तर...
raj thackeray
| Updated on: Jul 08, 2025 | 8:25 PM
Share

राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण ठवळून निघाले आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोललंच पाहिजे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज (8 जुलै) मनसे, ठाकरे गटाने मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते. दरम्यान, मनसे, ठाकरे गटाच्या या भूमिकेनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेत्यांनी तर थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यानंतर आता आणखी एका खासदाराने राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला महाराष्ट्राच्या बाहेर काढून दाखवा, असे खुले आव्हानच या खासदाराने दिले आहे.

राज ठाकरे यांना खुले आव्हान देणाऱ्या खासदाराचे नाव राजीव राय असे आहे. राजीव राय हे समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी थेट ठाकरे बंधूंना खुले आव्हान दिले आहे. राय यांनी हे आव्हान दिल्यानंतर आता ठाकरे बंधू तसेच समस्त महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

राजीव राय नेमकं काय म्हणाले?

राजीव राय यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी भाषा, मराठी भाषा, बॉलिवूड तसेच राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात तुमची राजकीय ताकद निर्माण का होऊ शकलेली नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गरीब हिंदी भाषिकांसोबत गुंडगिरी करणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे, असं राजीव राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुमच्यात हिंमत असेल तर…

तसेच, हिंदी चित्रपटांमुळे बॉलिवुडला ओळख मिळाली. याच हिंदी चित्रपटांनी तुमच्या कुटुंबाची अब्जो रुपयांची कमाई झाली. या हिंदी चित्रपटांच्या विरोधात तुम्ही का बोलत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला मुंबईच्या बाहेर काढून दाखवा, असे खुले आव्हानही राजीव राय यांनी राज ठाकरे यांना दिले. तसेच गरीब हिंदी भाषिक लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात जात असतील तर हजारो मराठी कुटुंब हे हिंदी सिनेमांच्या मदतीनेच जीवन जगतात, असा दाखला राजीव राय यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज हे…

मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे. या देशातील एखादा भाग फक्त भाषेच्या मुद्द्यावरून कोणाच्याही बापाचा होऊ शकत नाही. देशातील प्रत्येक भागावर प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमच्या एकट्याचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे हिरो आहेत, असेही राजीव राय म्हणाले.

तुम्ही थोडं आत्मचिंतन करणं गरजेचं

लक्षात ठेवा या देशाची संस्कृती अतिथी देवो भव: अशी आहे. तुम्ही करत असलेल्या गुंडगिरीवर औषध आहे. सगळं काही ठीक होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही थोडं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असा सल्लाही राजीव राय यांनी राज ठाकरे यांना दिलाय.

दरम्यान, आता राजीव राय यांच्या या घणाघाती टीकेनंतर मनसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, असे खुले आव्हान निशिकांत दुबे यांनी दिले होते. त्यानंतर आता राजीव राय यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.