Raksha Khadse | पक्षांबाबत विचार वेगवेगळे असू शकतात, पण कुटुंब म्हणून आम्ही सोबतच : रक्षा खडसे

यावेळी पहिल्यांदाच एकनाथ खडसेंविना खासदार रक्षा खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Raksha Khadse | पक्षांबाबत विचार वेगवेगळे असू शकतात, पण कुटुंब म्हणून आम्ही सोबतच : रक्षा खडसे
Raksha Khadse
Nupur Chilkulwar

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 15, 2021 | 8:00 PM

जळगाव : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे (MP Raksha Khadse On Eknath Khadse). यावेळी मुक्ताईनगर येथे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी कोथळी गावात मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यावेळी पहिल्यांदाच एकनाथ खडसेंविना खासदार रक्षा खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला (MP Raksha Khadse On Eknath Khadse)

काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात, एकाच घरात राहूनही सून रक्षा खडसे भाजपमध्ये तर एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आहे.

कुटुंब म्हणून आम्ही सोबतच : रक्षा खडसे

“परिवार म्हणून आम्ही सोबतच आहे, नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते. एका घरात राहतो, विचार पक्षांना घेवून वेगवेगळे असू शकतात. एकनाथ खडसे आज मुंबईमध्ये असल्यामुळे मी आज मतदानाचा हक्क गावकऱ्यांसोबत बजावला”, असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमासी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणूक

मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. तसेच, सोशल डिस्टन्सचे नियम पाडून मतदान करण्यात येत आहे.

मुक्ताईनगर 47 ग्रामपंचायत निवडणूक आतापर्यंत 14.60 टक्के मतदान, मुक्ताईनगर आतापर्यंत झालेले एकूण मतदान 11,140, मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींसाठी मतदान केंद्रांची संख्या 151, निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले कर्मचारी संख्या 755, एकूण मतदार संख्या 76,300

MP Raksha Khadse On Eknath Khadse

संबंधित बातम्या :

Dhananjay Munde Case | माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता: रोहित पवार

Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटील

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021 : मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नाव गायब, मतदान केंद्रावर गोंधळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें