AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदेंचे रेल्वे प्रशासनाला पत्र

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया दिली आहे.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदेंचे रेल्वे प्रशासनाला पत्र
Diva to CSMT local
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 09, 2025 | 11:05 PM
Share

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंनी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी या घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रही लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडूनही दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे आता यावर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत बोलताना खासदार शिंदे म्हणाले की, ‘दिवा-सीएसटी लोकल चालू करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा काही वर्षांपासून करत आहे. इथे जलदगती लोकलच्या थांब्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. पण या मार्गिकेवर जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवायला हव्यात. पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत जाईल, तेव्हा ते शक्य होईल.

लोकल गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं – श्रीकांत शिंदे

पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, ‘कर्जत-कल्याण भागात मोठ्या प्रमाणावर लोक राहायला गेले आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. तशी मागणीही वारंवार केली जात आहे. पाचवी-सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ झाली. पण सीएसटीपर्यंत ही पाचवी व सहावी मार्गिका जायला हवी. त्यावर रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. त्यानंतर लोकल गाड्या वाढू शकतात. त्याशिवाय कल्याणच्या पुढे तिसरी व चौथी मार्गिका टाकण्यासाठी जमीन अधिग्रहण वगैरे प्रक्रिया चालू आहे.’

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी