Breaking : MPSC कडून SEBCच्या जागांवर तोडगा, SEBCच्या सर्व जागा आता खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार

प्रदीप कापसे

| Edited By: |

Updated on: Jul 14, 2021 | 8:31 PM

MPSCने SEBCच्या विद्यार्थ्यांनी एक सुधारित परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार आता MPSCतील SEBC प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत.

Breaking : MPSC कडून SEBCच्या जागांवर तोडगा, SEBCच्या सर्व जागा आता खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Follow us on

पुणे : SEBC प्रवर्गातून पदभरतीसाठी अर्ज केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून SEBCच्या जागांबाबत तोडगा काढण्यात आलाय. MPSCने SEBCच्या विद्यार्थ्यांनी एक सुधारित परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार आता MPSCतील SEBC प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. SEBCच्या जागा खुल्या प्रवर्गात रुपांतरित करुनच आयोग निकाल लावणार आहे. SEBCच्या जागा खुल्या गटात वर्ग करुन आरक्षणानुसार पदसंख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. (All the posts in the SEBC category will now be filled from the open category)

कोणत्या परीक्षांमध्ये SEBCच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार?

एमपीएससी गट ब पुर्व परीक्षा 2020 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पुर्व परीक्षा 2020 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पुर्व परीक्षा 2020 संयुक्त गट ब अराजपत्रित 2020

15, 511 पदांची भरती लवकरच

राज्याचे माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नोकर भरतीबाबतची मोठी घोषणा केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणाच दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजरा 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट कची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असं भरणे यांनी सांगितलं.

एमपीएससीच्या सदस्यांची पदे भरणार

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, MPSC बाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Uddhav Thackeray : देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेच नंबर वन!

All the posts in the SEBC category will now be filled from the open category

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI