BMC Mayor : आता भाजपही सावध, नगरसेवकांना थेट सूचना, आठ दिवस…
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्तास्थापनेसाठी शिंदे सेना महत्त्वाची आहे. महापौर निवडीचा पेच असल्याने भाजपने नगरसेवकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत, यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 29 महापालिकांची निवडणूक संपन्न झाली आणि शुक्रवारी मतमोजणीचा निकालही लागला. राज्यात भाजप मोठा पक्ष ठरला असून सर्वांच लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेवर झेंडा फडकावण्यातही आता भाजपला यश मिळताना दिसत आहे. बीएमसी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवेसना शिंदे गट यांच्या महायुतीला बहुमत मिळालं असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर त्यांचाच भगवा फकणार आहे. या निवडणुकीत भारतय जनता पक्षाला 89 तर शिंदेच्या शिवसेनाला 29 जागा मिळाल्या आहेत. भाजप हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही सत्तास्थापनेसाठी त्यांना शिंदेंच्या सेनेची गरद पडणार हे नक्की. त्यामुळेच सेनेच्य उमेदवारांचाही भाव वाढला असून त्या सर्वांना संध्या मुंबईतील मोठ्या, पंचतारांकित हॉटेलमध्येच ठेवण्यात आलं आहे.
याच दरम्यान अनेक पक्षातील इनकमिंग-आऊटगोईंग अद्यापही सुरू असून विजेते नगरसेवकांच्या पळवाापळवीचा,फोडाफोडीचा प्रकारही जोर धरू शकतो. हेच लक्षात ठेऊन सर्वच पक्षांनी आपापल्या विजेत्या नगरसेवकांना अगदी कोंदणात जपून ठेवलं आहे. शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना थेट वांद्रे येथील ताड लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवल्याने हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल्याची चर्चा रंगली. आता महायुतीत शिंदेंचा सहकारी पक्ष असलेल्या आणि मुंबईत देखील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना काही सूचना दिल्या आहेत.
आता भाजपही सावध, नगरसेवकांना थेट सूचना
मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक संपून निकाल लागला असल तरी महापौर कोण हे अद्याप जाहीर झालेलं नाही. मुंबईचा महापौर कोण ? हा तर अतिशय महत्वाचा कळीचा प्रश्न ठरत असून त्याकडेच सर्वांचे लक्षही लागलेले आहे. मात्र आरक्षण सोडत न निघाल्यामुळे महापौर निवडीस अजून काही काळ लागू शकतो. त्यातच मुंख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले असून महापौर निवडीचा पेच सुटण्यास आणखी काही दिवस लागू शकतात.
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक महत्वाचे पाऊल टाकले असून ” पुढील आठ दिवस मुंबईबाहेर जाऊ नका” अशा सूचा नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत . त्यामुळे कोणीच मुंबईबाहेर जाऊ नये अश्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं, तोपर्यंतचा प्रत्येक दिवस अतिशय महत्वाचा असून त्याच पार्श्वभूमीवर भाजपसाठी नगरसेवकांना नीट राहण्याच्या , मुंबबाहेर न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ठाकरे सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची घेणार भेट
तब्बल 20 वर्षांनी एकत्र येत मुंबई महापालिकेत युती करून निवडमऊक लढवणार राज व उद्धव ठाकरे हे बंधू या निवडणुकीत एकदम स्पॉटलाइटमध्ये होते. बीएमसी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 65 कतर मनसेला 6 जागा मिळाल्या. शनिवारी मनसेचत्या नगरसेवकांनी राज व शर्मिला ठकरे यांची भेट घेतली. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
याचदरम्यान आज एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे, ठाकरे सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक हे राज ठाकरे याच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी येणार असून तेथे ते राज यांची भेट घेतील. या आधी मनसेचे नगरसेवक विजयानंतर शिवतीर्थ येथे येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. सर्वांचे राज व शर्मिला ठाकरे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या.
