AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनावर सुनावणी, त्या कृतीमुळे न्यायालयाचा संताप; नेमकं काय घडलं?

जरांगे यांच्या या आंदोलनालामुळे संपूर्ण मुंबईचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान पूर्ण ताकदीने युक्तिवाद केला जात आहे. पण युक्तिवाद सुरु असतानाच न्यायाधीशांनी संताप व्यक्त केलाय. नियमांचे उल्लंघन होत असल्याने न्यायमूर्तींनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनावर सुनावणी, त्या कृतीमुळे न्यायालयाचा संताप; नेमकं काय घडलं?
manoj jarange patil
| Updated on: Sep 01, 2025 | 3:10 PM
Share

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मुंबईत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण चालू आहे. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणार अशी भूमिका घेऊन जरांगे आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. जरांगे यांच्या या आंदोलनालामुळे संपूर्ण मुंबईचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान पूर्ण ताकदीने युक्तिवाद केला जात आहे. पण युक्तिवाद सुरु असतानाच न्यायाधीशांनी संताप व्यक्त केलाय. नियमांचे उल्लंघन होत असल्याने न्यायमूर्तींनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

30 आणि 31 ऑगस्टच्या आंदोलनाला परवानगी नव्हती

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्याचे महाधिवक्ते विरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. 5000 आंदोलकांची मर्यादाही ओलांडण्यात आली. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिली नव्हती, अशी मोठी माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आमरण उपोषणाची परवानगी नाही तरीदेखील ते चालू आहे. सामान्यांना त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद केला आहे. दरम्यान हा सर्व युक्तिवाद चालू असताना न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

न्यायालयाचा संताप, नेमकं काय घडलं?

सध्या न्यायालयात जरांगे यांच्या आंदोलनावर युक्तिवाद चालू आहे. आंदोलनाला विरोध करणारे याचिकाकर्ते मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. हा युक्तिवाद चालू असताना न्यायालयाच्या परिसरात मराठा आंदोलक जमले आहेत. सुनावणीदरम्यान या आंदोलकांचे वकीलही न्यायालयात उपस्थित आहेत. युक्तिवाद चालू असतानाच आंदोलकाच्या वकिलाने बोलण्याचा प्रयत्न केला. हस्तक्षेप अर्ज दाखल न करता हा बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच वेळी न्यायालयाने यावर आक्षेप व्यक्त केला. आंदोलकाच्या वकिलाला न्यायालयाने थांबावले. तसेच संताप व्यक्त करत हस्तक्षेप अर्ज दाखल न करता कसे बोलू शकता? असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आंदोलकांचे वकील शांत झाले असून न्यायालय नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...