AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरु होणार, तारीख आली समोर

लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

आनंदाची बातमी! मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरु होणार, तारीख आली समोर
Vande Bharat
| Updated on: Jun 11, 2025 | 8:42 PM
Share

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती, या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे.

कोल्हापूरमधील अनेक लोक मुंबईला कामानिमित्त ये-जा करत असतात. तसेच मुंबईतील अनेक पर्यटक कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संख्या जास्त आहे, मात्र रेल्वेची चांगली कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती, त्यानुसार आता या मार्गावर ट्रेन सुरु होणार आहे.

सध्या पुणे-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत ट्रेन

सध्या कोल्हापूर-पुणे या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहे. ही मिनी वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस धावते. या ट्रेनला ८ डब्बे असून यात एसी चेअर कार आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचाही समावेश आहे.

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरु होणार?

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरु होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या १५ दिवसांत या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, “ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल.” हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर या मार्गासाठी भाडे काय असेल याची माहितीही समोर येणार आहे.

वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये

वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली खास आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ट्रेन आहे. या ट्रेनचा कमाल वेग 160 किमी/तास आहे. या ट्रेनच्या सर्व कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. तसेच ट्रेनचे सर्व कोच पूर्णतः वातानुकूलित आहेत. प्रवासादरम्यान स्थानकांचे अपडेट LCD स्क्रीनवर दिले जातात. तसेच यात आधुनिक व्हॅक्युम बायो-टॉयलेट्स आहेत. या ट्रेनला पारंपरिक ट्रेनच्या तुलनेत 30% कमी वेळ लागतो.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा