AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : यवतमाळ : बोरगाव डॅममध्ये बुडून दोन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू

| Edited By: | Updated on: Aug 14, 2026 | 7:55 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : नाशिक पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये भूकंप झाला असून,  3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे.

Maharashtra News LIVE : यवतमाळ : बोरगाव डॅममध्ये बुडून दोन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू
maharashtra news live updatesImage Credit source: टीव्ही 9 मराठी

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Aug 2026 07:53 PM (IST)

    यवतमाळ : बोरगाव डॅममध्ये बुडून दोन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू

    यवतमाळच्या बोरगाव डॅम येथे फिरायला गेलेल्या दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. मोहिनी नागोराव गोत्रे आणि अमृता खेडकर असे पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या दोघींची नावे आहेत.

  • 14 Aug 2026 07:40 PM (IST)

    भाजप आमदार राजेश वानखडे यांनी घेतली अमित शहांची भेट

    अमरावतीच्या तिवसा मतदार संघाचे भाजप आमदार राजेश वानखडे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी आमदार वानखडे यांची शहांकडे केली आहे.

  • 14 Aug 2026 07:28 PM (IST)

    नांदेड – किन्नरांच्या दोन गटात हाणामारी

    नांदेड मध्ये किन्नरांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकमेकांच्या हद्दीत भीक मागण्याच्या कारणावरून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 14 Aug 2026 07:15 PM (IST)

    नाशिक – पेठ तालुक्यात भूकंपाचे धक्के

    नाशिकच्या पेठ तालुक्यात आज दुपारी 4 वाजून 52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गोंदे, बोरवट, देवगाव आणि भयगाव परिसरात धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 14 Aug 2026 06:48 PM (IST)

    सुखबिरसिंग यांच्यावरील हल्ला, आरोपीला ११ दिवसांची कोठडी

    पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जसपाल सिंग याला आज नांदेडच्या मुदखेड येथील प्रथम वर्ग न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. आरोपीची वेगवेगळ्या अंगाने अनेक एजन्सीला तपासणी करायची असल्याने आरोपीला पंधरा दिवसाची पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी जसपाल सिंगला 11 दिवसाची पोलीस कोठडी दिली

  • 14 Aug 2026 06:39 PM (IST)

    आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशपूर्तीनिमित्त मुंबईत भव्य नागरी सत्कार

    केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशपूर्तीनिमित्त मुंबईत भव्य नागरी सत्कार सोहळा करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुंबई प्रदेशाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून  मुंबई, ठाणे परिसरातील आंबेडकरी समाजबांधव आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

  • 14 Aug 2026 06:15 PM (IST)

    जालना ते वडीगोद्री या महामार्गावर मालवाहू ट्रक कालव्यात कोसळला

    जालना ते वडीगोद्री या महामार्गावर वडीगोद्री शिवारात गोदावरी नदीवर असलेल्या कालव्यात भरधाव वेगात असलेला एक मालवाहू ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हर आणि क्लिनर सुखरूप असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. भरधाव वेगात असलेला हा ट्रक कालव्याजवळ येतात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक कालव्यामध्ये कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

  • 14 Aug 2026 05:00 PM (IST)

    ‘हर घर तिरंगा’ अभियानाला राहात्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांचा सहभाग

    ‘हर घर तिरंगा अभियानातर्गत राहाता नगरपालिकेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली…हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.या रॅलीत शालेय विद्यार्थी , माजी सैनिक , सर्व क्षेत्रातील मान्यवर ‌तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी तिरंगा फडकावत देशभक्तीचा उत्स्फूर्त जागर केला. युवक, महिला, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.‘हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याबरोबरच स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यात आली..रॅलीचा समारोप पुन्हा राहाता नगरपरिषद येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना देशभक्तीची भावना जपण्याचे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन केले.या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढवण्याचा उद्देश्य असल्याच यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.

  • 14 Aug 2026 04:50 PM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक बस थांब्यांची दुरवस्था

    मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. मुक्ताईनगर कु-हा रस्त्यावरील अनेक बस थांबा बांधण्यात आले आहेत बस थांबांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून प्रवासी वर्गांची मोठी गैरसोय या ठिकाणी होत आहे. संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे

  • 14 Aug 2026 04:40 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका

    राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीका केली. प्रधानमंत्री मोदी आता व्हिडिओ करत आहे, मोदी सरकार आता पॅनिक परिस्थितीत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री पद ज्यांना दिल आहे त्यांनी आधीच अकलेचे तारे तोडले आहेत, शिक्षण आणि परीक्षा बदलेल असा व्यक्ती मला मोदी सरकार मध्ये दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नावही आघाडीवर होत पण परिस्थिती बदलली. मोदी सरकारला 2029 च्या निवडणूकीची खात्री नाही, 2/3 बहुमतासाठी राजकीय पक्ष फोडले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

  • 14 Aug 2026 04:30 PM (IST)

    मेंढपाळांचे आंदोलन चिखळले

    मालेगावातील वन विभागाच्या कार्यालयाच्या समोरील मेंढपाळांचे आंदोलन चिखळले. मेंढ्यांसहित वनपरिक्षेत्राधिकार्‍याच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महिला आंदोलन आणि महिला पोलिसांमध्ये धक्काबुक्की करण्यात आली. सुमारे चार तासापासून जास्त सुरू असलेले आंदोलन तोडगा न निघालेले आंदोलन चिघळले. शहरातील कॅम्प रोड पूर्णपणे बंद झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

  • 14 Aug 2026 04:20 PM (IST)

    हिरामण खोसकर यांच्या मुलाची तालुका प्रमुखाला ठार मारण्याची धमकी

    राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलाची शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुखाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वामन हिरामण खोसकर यांचा शिवीगाळ आणि धमकीचा कॉल रेकॉर्ड व्हायरल, टीव्ही 9 मराठी व्हायरल ऑडिओची पुष्टी करत नाही. वामन हिरामण खोसकर यांच्या विरोधात शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांची नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार केली. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेतील वाद या प्रकरणामुळे चव्हाट्यावर आला. आमदाराचे अधिकारी असताना आमदार पुत्र बैठका घेऊन ग्रामसवेकाना धमकी देत मला मदत न करण्यासाठी देतात त्रास असा आरोप रवींद्र भोये यांनी केला आहे.

  • 14 Aug 2026 04:10 PM (IST)

    रस्ते खड्डेमुक्त झाले तर आर्थिक संकट येईल!

    रस्ते खड्डेमुक्त झाले तर आर्थिक संकट येईल. खड्ड्यांमुळे कंत्राटदार अन् डॉक्टरांचा रोजगार बुडेल. सहन करा, गप्प बसा… किंवा सोशल मीडियावर व्यक्त व्हा, अशा आशयाची अनोखी बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. कल्याण डोंबिवली मधील खड्ड्यांवर डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेची अनोखी ‘बॅनरबाजी’ चर्चेत आली आहे.

  • 14 Aug 2026 04:00 PM (IST)

    भाजपच्या तिरंगा यात्रेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा प्रतिसाद

    भाजपच्या तिरंगा यात्रेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगा यात्रेत थोड्याच वेळात सहभागी होणार. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले आहेत. संभाजी पेठ, गुलमंडी, पैठण गेट, मार्गे क्रांती चौकत होणार तिरंगा यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री मेघना बोर्डीकर माजी मंत्री भागवत कराड यांच्यासह खासदार आमदार उपस्थिती राहणार आहे.

  • 14 Aug 2026 03:59 PM (IST)

    राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं- रोहित पवार

    राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं. चाकण MIDCमधील उद्योजकांच्या समस्येवरुन रोहित पवारांची टीका. MIDCमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप

  • 14 Aug 2026 03:45 PM (IST)

    अमरावती मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा तब्बल 490 कैदी जास्त

    अमरावती मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा तब्बल 490 कैदी जास्त.. 797 कैद्यांची असताना प्रत्यक्षात 1287 कैदी बंदिस्त..कारागृहात क्षमतेपेक्षा तब्बल 490 कैदी अधिक असल्याने प्रचंड गर्दी.

  • 14 Aug 2026 03:35 PM (IST)

    डोंबिवलीत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रचला जाणार इतिहास!

    स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत 35 हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा घेऊन 15 हजार विद्यार्थी आणि 25 हजार नागरिक तिरंगा रॅली काढणार… घारडा सर्कल ते दत्तनगरपर्यंतच्या रॅलीचा 150 फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहणाने समारोप होणार… विश्वविक्रम रचण्याचा आयोजकांचा दावा…

  • 14 Aug 2026 03:25 PM (IST)

    शिवसेनेबाबत मंगळवारी पुढील सुनावणी होणार

    निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला….. शिवसेनेची केस युनिक आहे… कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य… शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार…

  • 14 Aug 2026 03:10 PM (IST)

    पुण्यात घाटमाथ्यावर येत्या दोन दिवसात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता

    गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस होताना दिसत नाही मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात काही ठिकाणी विदर्भातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडासह,घाटमाथ्यावर जोरदार मुसळधार पाऊस आणि पुण्यासह ग्रामीण भागात रिमझिम पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तविली आहे.

  • 14 Aug 2026 02:48 PM (IST)

    आदिवासी विद्यार्थ्यांचं भंडारा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

    आदिवासी वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय २६ वर्षापेक्षा जास्त नसावं…. शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देऊ नये, यासह विविध अटी शर्तीचा आदेश आदिवासी मंत्रालयानं काढला आहे. या आदेशाच्या विरोधात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनीचं भंडाऱ्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी भंडारा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ही आंदोलन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खडबडून आली आहे. दरम्यान प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी विद्यार्थ्यांचं निवेदन प्राप्त झाला असून याबाबत वरिष्ठ स्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असं सांगितलं

  • 14 Aug 2026 01:57 PM (IST)

    स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात निघाली भव्य तिरंगा पदयात्रा

    स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात निघाली भव्य तिरंगा पदयात्रा. हातात तिरंगा घेऊन शेकडो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर, देशभक्तीचा जल्लोष. भाजप नेते परिणय फुके पदयात्रेत सहभागी, भारत माता की जय च्या घोषणांनी शहर दुमदुमले.

  • 14 Aug 2026 01:51 PM (IST)

    सिद्धिविनायक मंदिरात कंत्राटी कामगाराचा मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू

    सिद्धिविनायक मंदिरात खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. स्वयंपाकघरातील सुरक्षा यंत्रणा आणि अपघाताचे नेमके कारण याविषयी दादर पोलीसांकडून चौकशी सुरू. जेवण बनवताना उकळलेल्या पाण्याचा टोप अंगावर पडून 60 टक्के भाजला होता कर्मचारी. उपचारादरम्यान काल सचिन रसाळ या ३२ वर्षीय कर्मचाऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती

  • 14 Aug 2026 01:48 PM (IST)

    मालेगाव तालुक्यातील मोहपाडे येथे मेंढपाळांचा बिऱ्हाड मोर्चा

    मालेगाव तालुक्यातील मोहपाडे येथे मेंढपाळांचा बिऱ्हाड मोर्चा. मालेगाव तालुक्यातील मोहपाडे येथील आंदोलकांचा वनविभागाच्या कार्यालयावर शेकडो मेंढ्यांसह बिऱ्हाड मोर्चा. शेकडो मेंढ्यांसह मेंढपाळांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले. वनजमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी. अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी. विविध मागण्यांसाठी मेंढपाळांचे तीव्र आंदोलन. आज निर्णय न घेतल्यास उद्या स्वातंत्र्यदिनी तालुकाभरातील मेंढपाळ आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा.

  • 14 Aug 2026 01:43 PM (IST)

    हिंदू असून हिंदू महासभेने ही मागणी करणे योग्य नाही – भाविकांनी व्यक्त केल्या भावना

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने फरासखाना पोलीस स्टेशनची जागा मागणी करण्यात आली आहे याला हिंदू महासभेने आक्षेप घेतलाय यावर श्रीमंत दगडूशेठ गणपती येथे दर्शनाला आलेल्या भाविकांनी हिंदू असून हिंदू महासभेने या जागेला आक्षेप घेणं हे योग्य वाटत नाही फरासखाना पोलीस स्टेशनला पर्यायी जागा देऊन मंदिराला ही जागा द्यावी अशी मागणी भाविकांनी यावेळी केलीय…

  • 14 Aug 2026 01:38 PM (IST)

    केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची तब्येत बिघडली

    केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची तब्येत बिघडली आहे. तर त्यांना तातडीने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

  • 14 Aug 2026 01:32 PM (IST)

    चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यानं सोडवणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यानं सोडवणार.”चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक तसंच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी प्राधान्यानं सोडवण्यात येतील. या समस्यांवर तातडीनं मार्ग काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. या संदर्भात आज चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांना आश्वस्त केलं. या प्रश्नांच्या अनुषंगानं एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. चाकणच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणं ही प्राथमिकता आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयानं या समस्यांवर लवकरच ठोस मार्ग काढण्यात येईल.”

  • 14 Aug 2026 01:28 PM (IST)

    लासलगाव बाजार समितीत टोमॅटोच्या लिलावला सुरुवात

    लासलगाव बाजार समितीत टोमॅटोच्या लिलावला सुरुवात. आज ७ हजार क्रेट्स टोमॅटोची आवक. टोमॅटोला जास्तीतजास्त ४११, कमीतकमी ३०० रुपये दर. तर सरासरी ३७५ रुपये प्रति क्रेटसला मिळाला दर. चांगला दर मिळात असल्याने टोमॅटो उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरणात. रोगांच्या प्रादुर्भावामुळे औषध फवारणीचा करावा लागतो अतिरिक्त खर्च. आगामी काळात टोमॅटोची आवक वाढणार. बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी निर्यातीला चालना देण्याची व्यापाऱ्यांची मागणी…

  • 14 Aug 2026 01:24 PM (IST)

    राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार झिशान सिद्दीकींना बिश्नोई गँगची धमकी

    राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार झिशान सिद्दीकी यांना विश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धमकी प्रकरणी झिशान सिद्दीकी आज संध्याकाळी 5.30 वाजता स्वतः वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन FIR दाखल करणार आहेत. ते स्वतः वांद्रे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून या प्रकरणी FIR नोंदवणार आहेत.

  • 14 Aug 2026 01:20 PM (IST)

    सुखबीर सिंग बादल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

    पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता, आता ते सुखरुप असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

  • 14 Aug 2026 01:15 PM (IST)

    अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी नियमांचे पालन केले नाही तर कारवाई-प्रताप सरनाईक

    अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, मराठी शिकण्यासाठी  15 ऑगस्ट हा शेवटचा दिवस असेल आणि 18 ऑगस्टपासून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे विधान प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

  • 14 Aug 2026 01:13 PM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी आली

    दिल्ली उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी आली आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहेत, तर धमकी खोटी असल्याचा पोलिसांना संशय.

  • 14 Aug 2026 01:11 PM (IST)

    राहुल गांधी यांनी छिछोरेपणा केला- फडणवीस

    फडणवीस राहुल गांधीवर म्हणाले की,”लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला, तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय आहे. ज्या प्रकारे देशाच्या पंतप्रधानांचा तर अपमान केलाच पण त्याचववेळी इटलीच्या महिल्या राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या थराला जाऊन जो अपमान केला असा प्रकार याआधी कोणीच केला नव्हता.”

  • 14 Aug 2026 01:07 PM (IST)

    चाकण MIDC वरुन फडणवीसांचे पवारांना उत्तर

    36 हजार कंपन्या बंद आणि चाकण MIDC वरुन फडणवीसांचे पवारांना उत्तर, “76% कंपन्यांची फक्त नोंदणीच, त्या सुरु झाल्याच नव्हत्या” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.

  • 14 Aug 2026 01:03 PM (IST)

    राहुल गांधी पप्पूच्या भूमिकेत वारंवार येताना दिसयातेय-प्रविण दरेकर

    “खालच्या पातळीवर टीका करुन राहुल गांधीनां काहीही साध्य होणार नाही, राहुल गांधी पप्पूच्या भूमिकेत वारंवार येताना दिसयातेय”. असा टोला राहुल गांधी यांना प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

  • 14 Aug 2026 12:54 PM (IST)

    सर्व प्रमुख कंपन्यांची कार्यालयं मुंबईत, पैसे गुजरातला जातात – रोहित पवार

    2014 नंतर किती कंपन्या आल्या ते सांगा… सर्व प्रमुख कंपन्यांची कार्यालयं मुंबईत, पैसे गुजरातला जातात. राज्यातील मोठे प्रोजेक्ट आंध्रप्रदेश, गुजरातमध्ये गेले… उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग बंद कारावे, उद्योजकांनी अडचणी सुटल्या नाहीतर, सरकारला महागात पडेल.. असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

  • 14 Aug 2026 12:30 PM (IST)

    प्रसिद्ध यमाई तलावाच्या संवर्धनाला आता पर्यावरणपूरक विकासाची जोड मिळणार

    शहरातील प्रसिद्ध यमाई तलावाच्या संवर्धनाला आता पर्यावरणपूरक विकासाची जोड मिळणार आहे. उपनगरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने १५ कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प सुरू केला आहे. परदेशी पक्षी आणि विविध प्रजातींच्या माशांचे अधिवास असलेल्या या तलावाचे पर्यावरण जपण्यासोबतच भविष्यात बोटिंग, जलतरण तलाव आणि नागरिकांसाठी विविध सुविधाही उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे याचाच आढावा घेतला आहे

  • 14 Aug 2026 12:22 PM (IST)

    शरद पवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला – सुप्रिया सुळे

    शरद पवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. शिंदेंनी मनसेसारखा वेगळा पक्ष स्थापन केला पाहिजे होता. राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी कोर्टाकडे तारीख मागतेय… निवडणूक आयोगाकडून शिवसेना, राष्ट्रवादीवर अन्याय झाला आहे. असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

  • 14 Aug 2026 12:14 PM (IST)

    स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात निघाली भव्य तिरंगा पदयात्रा

    स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात भव्य तिरंगा पदयात्रा निघाली. हातात तिरंगा घेऊन शेकडो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर, देशभक्तीचा जल्लोष दिसून आला. भाजप नेते परिणय फुके पदयात्रेत सहभागी झाले असून भारत माता की जय च्या घोषणांनी शहर दुमदुमले आहे.

  • 14 Aug 2026 11:53 AM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा

    पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा कायम असल्याचे समोर आलं आहे. या मार्गावर पाच ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या खड्ड्यांतून कामगारांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. रात्री चाकण परिसरात झालेल्या अपघातांत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • 14 Aug 2026 11:50 AM (IST)

    जयंत पाटील यांचा थेट एसटी आगारात Gen Alpha शी संवाद

    शरद पवार गटाचे नेते,  माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी थेट ईश्वरपूर एसटी बस आगारात तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. विद्यार्थी आणि जयंतराव पाटील यांच्यातील हा संवाद लक्षवेधी ठरत आहे. उरुण ईश्वरपूर एसटी आगारात जयंत पाटील हे सहकाऱ्यांसह राजामाता जिजाऊ या बसेसचे लोकार्पण करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी एसटी आगारात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

  • 14 Aug 2026 11:38 AM (IST)

    पुढील राजकारण जेन-झी भोवती फिरणार – राज ठाकरे

    राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंनी पदाधिकऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. ‘जेन-झी कडे फोकस करा. च्यांच्याशी संपर्क वाढवा. पुढील राजकारण जेन-झी भोवती फिरणार आहे. ते वेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत, असे राज ठाकरेंनी सांगितले.

  • 14 Aug 2026 11:20 AM (IST)

    पदवीधर निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांचा सभांचा धडाका

    चंद्रपुर , गोंदिया , भंडारा इथे पदवीधर निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्याकडून प्रचार आणि सभांचा धडाका सुरू आहे. दोन दिवसीय दौऱ्यात नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर आणि ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या ठिकाणी संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठकात पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यांनी नागपूर पदवीधर निवडणूक जिंकण्याचा प्रदेश भाजपचा दावा केला आहे.

  • 14 Aug 2026 11:06 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर

    राज्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  जालना शहरालगत  रेशीम कोष बाजारपेठ असणार आहे. यामुळे रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवाना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 14 Aug 2026 10:50 AM (IST)

    परभणी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

    गर्भवती महिला मूर्ती प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार यांना निलंबित केल्याप्रकरणी कामाचाऱ्यांचं काम बंद आंदोलन.जोपर्यंत डॉ. नागेश लखमवार यांना सेवेत रुजू केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.आंदोलकांचा इशारा..

  • 14 Aug 2026 10:40 AM (IST)

    गडचिरोली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गडचिरोली जिल्ह्यात आज दौरा

    जिल्ह्यातील जपतलाई आश्रम शाळेत आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे_शाळेला देणार भेट. येथील शिक्षक व प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार जपतलाई आश्रम शाळेतील सर्पदंश प्रकरणाच्या

  • 14 Aug 2026 10:30 AM (IST)

    बार्शी तालुक्याच्या सिंचनासाठी मंत्रालयात मंत्री विखे पाटलांसोबत निर्णायक बैठक

    बार्शी तालुक्यातील 21 वंचित गावांना बचत पाण्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा. आमदार राजेंद्र राऊतांच्या पाठपुराव्याला अखेर यश. सहा लघु प्रकल्प बंदिस्त पाइपलाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वेक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा. या बैठकीला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे एमडी, मुख्य अभियंता तसेच जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • 14 Aug 2026 10:20 AM (IST)

    डोंबिवलीत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रचला जाणार इतिहास!

    ३५ हजार चौरस फुटांच्या तिरंग्यासह १५ हजार विद्यार्थी, २५ हजार नागरिक आणि १५० हून अधिक संस्थ घडवणार नवा विश्वविक्रम!घारडा सर्कल ते दत्तनगरपर्यंत तिरंगा रॅली; १५० फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहणाने समारोप

  • 14 Aug 2026 10:10 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित तिरंगा यात्रा

    भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रेनिमित्त शहरातील चौका चौकात जोरदार बॅनरबाजी. काही बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो तर काही बॅनरवर फक्त भाजपांच्या नेत्याचे फोटो. दुपारी दोन वाजता संभाजी पेठ ते क्रांती चौक अशी निघणार तिरंगा यात्रा.

  • 14 Aug 2026 09:51 AM (IST)

    हरसिमरत कौर श्री सचखंड गुरुद्वारा येथील अखंडपाठ कार्यक्रमाला उपस्थित

    माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार हरसिमरत कौर श्री सचखंड गुरुद्वारा येथील अखंडपाठ कार्यक्रमात झाल्या सहभागी. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ बादल कुटुंबासोबत नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते. काल माता साहिब गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन परतताना त्यांच्यावर हल्ला झाला. सध्या सुखबीर सिंघ बादल रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान बादल कुटुंबीयांनी नांदेडच्या गुरुद्वार येथे अखंडपाठ आयोजित केला होता. आज अखंडपाठची समाप्ती आहे. स्वतः सुखबीर सिंघ बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर उपस्थित आहेत. हरसिमरत कौर बादल आणि त्यांची मुलगी गुरुद्वारात अखंडपाठ समाप्ती कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आहेत.

  • 14 Aug 2026 09:35 AM (IST)

    कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरण, तीन तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

    कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जळगावच्या जामनेर शहरातील आणखी तीन तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात. तीन तरुणांना जामनेर मधून ताब्यात घेत पोलिसांनी सहा ते सात जणांची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणात जामनेर शहरातील आणखी काही तरूण नाशिक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती. यापूर्वी अटकेतील तसेच ताब्यात घेतलेल्या संशयितांची घरांचीही नाशिक पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली.

  • 14 Aug 2026 09:25 AM (IST)

    एअरपोर्ट टेंडरचे आमिष दाखवून 28 लाख 95 हजाराचा गंडा

    एअरपोर्ट टेंडरचे आमिष दाखवून 28 लाख 95 हजाराचा गंडा. अहमदाबाद विमानतळावर मोठे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पेट्रोल पंप चालकाची फसवणूक. फोनवरून विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संबंध असल्याचा दावा करत आरोपीने मिळवला विश्वास. टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली घेतले पैसे; टेंडर न मिळाल्याने आरोपीने संपर्क टाळला. प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

  • 14 Aug 2026 09:20 AM (IST)

    श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात VIP दर्शन बंद

    श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात VIP दर्शन बंद. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय. श्रावणातील प्रत्येक सोमवारी VIP दर्शनासह अभिषेक आणि महापूजा बंद. सामान्य भाविकांना जलद दर्शन मिळावे, हा प्रशासनाचा उद्देश. वेरूळच्या स्थानिक भाविकांसाठी पहाटे 4 ते सकाळी 8 विशेष दर्शनाची व्यवस्था, विशेष दर्शनासाठी आधार ओळखपत्र आवश्यक.

  • 14 Aug 2026 08:24 AM (IST)

    Maharashtra News LIVE : नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं

    मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक पुन्हा एकदा भूकपांच्या धक्क्याने हादरलं असून,  3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे, या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सुरगाणा तालुक्यात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे आज पुण्यात ओबीसी समाजाची निर्णयाक बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. घटामाथ्यासह, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यात आहे.  यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्रातील आणि इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Aug 14,2026 8:19 AM

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच