मुंबई पालिकेवर भाजपचा अश्वमेध की उद्धव यांचे ‘राज’ खालसा ? Axis My India चा एक्झिट पोलचा अंदाज काय ?
देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिकेवर अखेर भाजपाची सत्ता येणार की उद्धव आणि राज ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड करिष्मा दाखवणार याचा फैसला अवघ्या काही ताासांनी लागणार आहे. Axis My India च्या एक्झिट पोलचा अंदाज नेमका काय आहे हे पाहा...

महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांसाठी आज ( १५ जानेवारी २०२६ ) रोजी मतदान झाले. मुंबई महानगर पालिकेच्या निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या सकाळ ( शुक्रवार ) मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गुरुवारी मतदान संपल्यानंतर Axis My India चे एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. या Axis My India एक्झिट पोलच्या दाव्यानुसार भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाला १३१ -१५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्या युबीटी प्लस आघाडीला ५८ ते ६८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना ६ – १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबई महानगर पालिकच्या एकूण २२७ वॉर्ड्ससाठी हे मतदान झाले असून बहुमताचा आकडा ११४ अशा आहे.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ

axis my india exit poll
कोणाला किती टक्के ?
आता पार्टी वाईज व्होट शेअरिंगचा विचार करता, भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गटाला ४२ टक्के मिळाले आहे. यात भाजपाचे २८ टक्के आणि शिंदे यांच्या शिवसेनेला १४ टक्के व्होट मिळाले आहे. दुसरीकडे युबीटी – मनसे आणि एनसीपी शरद पवार गटाला ३२ टक्के व्होट मिळाल्याचा अंदाज आहे. युबीटीला २४, मनसे ७ आणि शरद पवार यांच्या पक्षाला १ टक्के व्होट शेअरिंग झाली आहे. तर काँग्रेस प्लस ( काँग्रेस, VBA आणि RSP)चा विचार करता आघाडीला १३ टक्के व्होट मिळाल्याचा अंदाज असून अन्य पक्षाच्या खात्यात १३ टक्के व्होट मिळाल्याचा अंदाज आहे.
कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या ?
| पक्ष | जागा |
|---|---|
| BJP | 136 |
| शिंदे यांची शिवसेना | 90 |
| UBT | 164 |
| MNS | 52 |
| NCP (शरद पवार) | 12 |
| काँग्रेस | 150 |
| VBA | 50 |
| RSP | 2 |
बीएमसी निवडणूकीत भाजपा-शिवसेना आघाडीचा मुकाबला एनसीपी ( शरद पवार गट ) आणि ठाकरे बंधूशी होता. सर्वांचे डोळे मुंबईच्या ७० हजार कोटी बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर आहे. उद्या १६ जानेवारी रोजी याचा निकाल येणार आहे. तेव्हाचे या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे आपली गेल्या २५ वर्षांची सत्ता कायम राखण्यात विजयी होतात की नाही हे कळणार आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी एकूण १७००उमेदवार मैदानात होते. त्यात ८२२ पुरुष उमेदवार आणि ८७८ महिला उमेदवार होते.
