सर्वात मोठी बातमी! मुंबईत मोठे उलटफेर, शिवसेना ठाकरे गटाचाच महापौर? प्लॅन तयार? राऊतांचे मोठे संकेत
आता राज्यातील जवळपास सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे, मात्र त्यातच आता संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकींचे निकाल हाती आले आहेत. मुंबईसह जवळपास सर्वच महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला मोठं यश मिळालं आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मुंबईच्या महापौरपदाबद्दल मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजूनही पूर्ण आकडे आलेले नाहीत, तरीही मुंबईत भाजपचा जल्लोष सुरू आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर जे निकाल यायला सुरुवात झाली त्यातील 80 ते 85 टक्के निकाल हे शिवसेना ठाकरे गटाच्या विजयाचे आहेत. आताच मला सांगितलं की वैशाली पाटणकर या विजयी झाल्या, विशाखा राऊत विजयी झाल्या, यशवंत किल्लेदरा आघाडीवर आहेत. बांदरामधून रोहिणी कांबळ जिंकल्या, त्यानंतर भांडूप, विक्रोळीमधून देखील शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सकाळी जे आकडे दाखवले जात होते, भाजपकडून जो भ्रम निर्माण केला जात होता, खोटे आकडे देऊन तुम्ही काय करणार? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नक्की अटितटीची लढत आहे, काटे की टक्कर आहे. परंतु तुम्ही जो फरक दाखवत आहात, मनसेचे उमेदवार देखील विजयी होत आहेत. भांडूपमध्ये त्यांचे दोन उमेदवार जिंकले, इतरही ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. शरद पवार गटालाही काही जागा मिळू शकतात. अशावेळी तुम्ही आव्हानाची भाषा करत आहात, ठीक आहे, मुंबईबाहेर काही ठिकाणी तुमचा विजय झाला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, पण मुंबईतील लढाई त्यापेक्षा वेगळी आणि मोठी आहे.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट पहिली प्रतिक्रिया...
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
मुरलीधर मोहोळ निकाल येताच अजितदादांवर बरसले, पहिली प्रतिक्रिया काय?
त्यामुळे ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याकडून लढली जाईल. ठाकरेंना आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला मर्यादा आहेत. तुम्ही सत्ता आणि पैशांच्या जोरावर नक्कीच जागा जिंकला आहात, पण अजून लढाई संपली कुठे? मुंबईचा पूर्ण निकाल हाती येईपर्यंत रात्रीचे बारा वाजतील. त्यानंतर आपण बोलू, या क्षणी मला असं चित्र दिसत आहे. की ही लढाई बोरोबरीत सुरू आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. आता आकडे झपाट्याने बदलत आहेत. शिवसेनेने मुंबईत 23 महापौर दिले, 24 वा महापौर देण्याचे आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू राहातील, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
