VIDEO | ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकली, एक्स्प्रेस वेवर अपघात, ट्रकचालक ठार

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाण्याच्या दिशेला बोरघाटात अंडा पॉईंटजवळ ट्रकला अपघात झाला (Truck Accident bottle Brake Paddle)

VIDEO | ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकली, एक्स्प्रेस वेवर अपघात, ट्रकचालक ठार
ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे ट्रक चालकाला ब्रेक दाबण्यास अडथळा निर्माण झाला

रायगड : ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) भीषण अपघात झाला. पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन ट्रक चालकाला प्राण गमवावे लागले. काल (सोमवार 3 मे) दुपारच्या सुमारास खोपोलीजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघाताचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत. (Mumbai Pune Express Way Truck Accident Water bottle stuck below Brake Paddle)

पाण्याची बाटली ठरली काळ

मुंबई पुणे दृतगती महामार्गावर बोरघाटात ट्रकला अपघात झाला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रवासात सातत्याने पाण्याची गरज लागते. ब्रेकजवळ ठेवलेली ‘जीवनदायी’ पाण्याची बाटलीच ट्रक चालकासाठी काळ ठरली.

ट्रकचालकाचा जागीच मृत्यू

ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे ट्रक चालकाला ब्रेक दाबण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाण्याच्या दिशेला बोरघाटात अंडा पॉईंटजवळ ट्रकला अपघात झाला. अपघातात ट्रक चालक दीपक वाघमारे (रा. लोणीकंद) याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक बोरघाट टँपचे परदेशी आणि टीम, आयआरबी टीम, सेव्ह लाईफ फाऊंडेशन, तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. परंतु दुर्दैवाने ट्रक चालकाला जागीच मृत्यू आला होता.

पाहा व्हिडीओ :

अपघातग्रस्तांना वाचवणाऱ्या हातांवर काळाचा घाला

अपघातग्रस्त कारला मदत करण्यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर थांबलेल्या पनवेल नगरसेवकाच्या मर्सिडीज कारला आयशर टेम्पोने मागून धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर नगरसेवक तेजस कांडपिले सुखरुप आहेत.आधी स्विफ्ट कारला कंटेनर ट्रेलरने धडक दिली होती. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी काही जण रस्त्याशेजारी थांबले, मात्र या देवदूतांच्या गाडीला आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने दोघा जणांना प्राण गमवावे लागले.

संबंधित बातम्या :

अपघातग्रस्त कारच्या मदतीला थांबलेल्या मर्सिडीजला धडक, दोघा देवदूतांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

(Mumbai Pune Express Way Truck Accident Water bottle stuck below Brake Paddle)

Published On - 7:32 am, Tue, 4 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI