AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी, रेल्वेही मंदावली; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेवरही परिणाम झाला असून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विलंबाने सुरू आहे. त्यामुळे ऑफीसला निघालेल्या चाकरमान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Mumbai Rain : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी, रेल्वेही मंदावली; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
| Updated on: Jul 20, 2024 | 8:40 AM
Share

मुंबईसह उपनगरांत शनिवार पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणखी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली असून पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरही होणार आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू आहे. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५-१० मिनिटे उशीराने सुरू आहे. तसेच हार्बर लाईनवरील लोकलही १५ ते २० मिनिटे उशिरा आहे.

सखल भागांत साचलं पाणी

शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. हवामान खात्याकडून आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आज व्यक्त करण्यात आला असून आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे . पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

कुठे , काय परिस्थिती ?

अंधेरी सबवे येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरूवात झाली असून तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पहाटे पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप एल बी एस मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र थोड्या वेळापूर्वी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून तेथेही अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचल्याचे वृत्त आहे.

कल्याण, डोंबिवलीतही पावसाचा जोर

मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पुढले काही तास शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या भागालाही पावसाने झोडपून काढल्याने रस्ते वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

तसेच काल रात्रीपासून अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे.

या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज, (शनिवार) मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेडलाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेजेसना सुट्टी

मुंबईसह राज्यभरातही आज पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नागपूरमध्येही सकाळपासून धो-धो पाऊस कोसळत असून जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आले. नागपुरातील विमानतळ परिसरातही पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसामुळे आज शहरातील सर्व शाळा – कॉलेजसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे विपीन ईटनकर यांनी हे आदेश दिले आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.