राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यात तैनात; 11 हजार 836 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; धोकादायक घाटातून एकेरी वाहतूक

दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 30 जूलैपर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी 7 ते 6 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यात तैनात; 11 हजार 836 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; धोकादायक घाटातून एकेरी वाहतूक
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:13 PM

मुंबई: पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाय योजना म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (National and State Disaster Response Force) 17 तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र (73 Temporary Shelter Centre) तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 31.8 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत.

वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 30 जूलैपर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी 7 ते 6 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

धोकादायक घाटातून एकेरी वाहतूक

तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनास विनंती

नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 14.0 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे चंद्रपूर शहरातील पाणी ओसरत आहे. इराई धरणातील विसर्ग कमी केला आहे. बल्लारपूर-राजुरा रस्ता बंद असल्याने नारिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनास विनंती केल्याप्रमाणे त्यांनी या दरम्यानच्या स्थानकांवर थांबा दिला आहे त्यामुळे नारिकांना सुविधा झाली आहे व आष्टी-गोंडपीपरी दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बंद आहे. आतापर्यंत नदीकाठच्या 994 लोकांना निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

 वैनगंगा, प्राणहिता व वर्धा  इशारा पातळीकडे

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 16.0 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. ही नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आला आहेत. जिल्ह्यात सध्या 10606 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी 35 मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

 गोदावरी नदीचा विसर्ग वाढवला

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे.लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असून विसर्ग 14.48 लक्ष क्युसेक असून त्यांनी सदर बॅरेजची पूर्ण संचय पातळी (FRL) पार केलेली आहे. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यात आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक तसेच एसडीआरएफची 2 पथके शोध व बचाव कार्याकरिता तैनात करण्यात आली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या

मुंबई (कांजूरमार्ग 1, घाटकोपर 1) -2, पालघर-1,रायगड- महाड-2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण-2,कोल्हापूर-2,सातारा-1,सिंधुदुर्ग-1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत. तर नांदेड-1, गडचिरोली -2 नाशिक -1, अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

कायमस्वरूपी 7 तुकड्या

मुंबई-3,पुणे-2 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-1,नागपूर-1 अशा एकूण 2 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.