AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंनी भाजपची ‘ती’ गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली, आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

टीव्ही9 मराठीच्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना मिंधे असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे शिंदेंबाबत असं काय म्हणालेत ज्याची इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे जाणून घ्या.

शिंदेंनी भाजपची 'ती' गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली, आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 06, 2024 | 5:21 PM
Share

माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही, आमचं हिंदु्तव चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना, मविआ सरकार असताना गिरीश महाजनांना अटकेचा प्रयत्न झाला का यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, अटकेची भीती कशासाठी होती. काही चुकीचं केलं असेल ना. एवढं घाबरण्याचं कारण काय होतं. आमचं तर भाजपच्या सरकार सारखं नव्हतं ना, कुणालाही अटक करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर शिदेंवर निशाणा साधताना, मिंधेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे मिंधे यांनी आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

युतीत आम्ही दोनदा फसलो. 2014 ला त्यांनी युती तोडली. जी लोकं धर्माच्या नावावर घरे जाळता, लोकांना मारता, दहा वर्षात या देशात एक तरी शाश्वत विकासाची गोष्ट दाखवा. स्वतच्या पक्षाची केली नाही. स्मार्ट सिटीचं काय झालं. स्वच्छ भारतचं काय झालं, नोटबंदी, आधारचं काय झालं. एकही कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. भाजप देशाला आणि महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहे. महाराजांच्या पुतळ्यात जी भाजप भ्रष्टाचार करू शकते त्यांच्यासोबत युती करणार का ? आम्हाला नकली संतान म्हणाले. पवारांना भटकती आत्मा म्हणते, त्यांच्याशी युती कशी होईल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल