AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा दावा, ‘हत्येच्या दिवशी मॉरिसने मलाही…’

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दीड महिन्यांनी घोसाळकर कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा दावा केलाय.

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा दावा, 'हत्येच्या दिवशी मॉरिसने मलाही...'
| Edited By: | Updated on: Mar 19, 2024 | 5:56 PM
Share

मुंबई | 19 मार्च 2024 : ठाकरे गटाचे माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दीड महिन्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह वकीलही होते. या पत्रकार परिषदेत तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पतीच्या हत्याच्या प्रकरणात योग्यप्रकारे तपास होत नाही, असा आरोप केलाय. तसेच विनोद घोसाळकर यांनीदेखील या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसेच आमच्यासोबत असलेल्या नगरसेवकांवर दबाव टाकला जातोय. छोट्या-छोट्या गोष्टीवरुण पोलीस गुन्हे दाखल करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत आहेत, असा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला. या पत्रकार परिषदेत तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा दावा केला. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोनाने त्यादिवशी मलाही कार्यक्रमाला बोलावलं होतं. पण उशिर झाल्याने अभिषेक यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं, असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी केला.

तेजस्वी घोसाळकर नेमकं काय म्हणाल्या?

“८ फेब्रुवारीला माझे पतीची हत्या झाली. त्याची वस्तुस्थिती सांगण्यासाठी बोलावलंय. हत्या झाली त्याचा योग्य तपास होत नाहीय. अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारीख यांचा वावर याबाबत आयुक्तांना तपास करण्यासाठी सांगितलं होतं. ५ मार्च रोजी न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले ते महत्त्वाचे आहेत. मॉरिस आणि मिश्रा याने सोबत बुलेट खरेदी केले, ती गन त्याची होती, मोरीसला त्याचा अॅक्सिस होता. आम्ही जमा केलेल्या गोष्टी आणि इतर पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत आणि तपासाची मागणी केलेली होती. सीसीटीव्ही दिले होते आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केलेली होती. मॉरिसला अमरेंद्र मिश्राने गन दिल्याचे स्पष्ट आहे. दोघांणी मिळून बुलेट खरेदी केल्या होत्या. अभिषेक आणि मॉरिस यांच्यात असणारे वाद मिश्राला माहिती होतं. त्या दिवशी अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावलं त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवण्यात आलेलं होतं. माझ्या दोन मुलांचे भविष्य, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. हायकोर्टाला एवढीच विनंती त्यांनी लवकर याचा निकाल लावावा”, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली.

विनोद घोसाळकर नेमकं काय म्हणाले?

“अभिषेकची हत्या झाली त्यावेळेला गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची काही विरोधी पक्षांनी मागणी केली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य वाईट होतं. गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागल का? असं ते म्हणाले. मंत्री उदय सामंत म्हणाले की हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की दोघांमध्ये गोळीबार झाला. त्याला पोलीस काय करणार? मी या तीनही लोकांसोबत काम केलंय. माझ्या परिवाराला ते ओळखतात. तरीही त्यांनी असं बेजबदार वक्तव्य केलं. यामुळे जास्त दु:ख झालं”, असं विनोद घोसाळकर म्हणाले.

“आम्ही जे फुटेज पोलिसांना दिलेले आहेत त्यात अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि अजून एक अज्ञात व्यक्ती वावरताना दिसतोय. हे फुटेज आम्ही जमवलेल आहेत. पोलिसांनी नाही. गृहमंत्री सभागृहात म्हणाले की गोळीबार झाला तेव्हा तिथे तिसरा व्यक्ती नव्हता. आम्ही तीन पत्र पोलीसांना दिलेली आहेत की तिसरा व्यक्ती कोणी होता का? याचा तपास करावा. या प्रकरणाचे तपास अधिकारी डीसीपी आणि सीनियर पीआय यांना मी फुटेज दाखवलेलं आहे. त्यांच्याकडे ते नव्हतं. दोघेही एकत्र कसे गोळ्या खरेदी करायला जातात? कलम 120 बी हे कट रचण्याचे कलम अद्याप लावले जात नाही. 40 दिवस झाले आहेत. पण अद्याप तपास योग्य दिशेने सुरु नाही”, असा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला.

“90 दिवसात आरोपपत्र दाखल केलं जातं. आम्ही काही वेगळी मागणी करत नाही. पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आम्ही हायकोर्टात रिट पिटीशन करणार आहोत. तपासयंत्रणा बदलून द्या, असं म्हणणार आहोत. सीबीआयला द्यायचं की आणखी कोणाकडे द्यायचं हे कोर्ट ठरवेल. मॉरिसला मिश्राने गन दिल्याचं कोर्टाने म्हटलंय. एकत्र जाऊन गोळ्या खरेदी केल्या असं म्हटलंय. तपास नीट होत नाही. मुख्यमंत्र्याना मुल जाण्याच दु:ख काय हे माहिती आहे. तसेच अभिषेक माझा मुलगा होता त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं”, असं आवाहन विनोद घोसाळकर यांनी केलं.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.