MLC Election 2022: एमआयएमची भूमिका ओवैसी जाहीर करतीलच, पण माझे मत खडसेंनाच; एमआयएमचे आमदार ट्रायडंटमध्ये दाखल

MLC Election 2022: एमआयएमचे आमदार फारुख शाह हे आज थेट ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले. या हॉटेलात राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे. यावेळी हॉटेलात उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

MLC Election 2022: एमआयएमची भूमिका ओवैसी जाहीर करतीलच, पण माझे मत खडसेंनाच; एमआयएमचे आमदार ट्रायडंटमध्ये दाखल
एमआयएमची भूमिका ओवैसी जाहीर करतीलच, पण माझे मत खडसेंनाचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 7:18 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ एमआयएमने (AIMIM) विधान परिषद निवडणुकीतही (MLC Election 2022) महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आमचं एक मत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना देणार असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या मताचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारूख शाह हे ट्रायडंटमध्ये दाखल झाले. त्यांनी माझं मत राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे (eknath khadse) यांनाच असेल असं स्पष्टपणे सांगितलं आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यामुळे एमआयएममध्येच आघाडीत कुणाला मतदान करायचं यावरून दुमत असल्याचं उघड झालं आहे. आज संध्याकाळपर्यंत एमआयएमकडून दोन्ही मतांबाबत अधिक तपशीलाने माहिती जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

एमआयएमचे आमदार फारुख शाह हे आज थेट ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले. या हॉटेलात राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे. यावेळी हॉटेलात उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार यांच्या भेटीसाठीच ते हॉटेलात आले होते. एकनाथ खडसे हे आमचे खानदेशातील लाडके नेते आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी मी आलो आहे. खडसे यांना पहिल्या पसंतीचं मत देणार असल्याचं सांगण्यासाठी मी अजित पवार यांच्या भेटीला आलो आहे, असं फारुख शाह यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आघाडीसोबतच आहोत

राज्यसभा निवडणुकीत आम्ही आघाडीसोबत होतो. आताही आघाडीसोबतच आहोत. आमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे रात्री उशिरा आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पण मी खडसे यांनाच मतदान करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जलील यांचा फोन नाही

चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितल्याबाबत शाह यांना विचारण्यात आलं. त्यावर हंडोरेंना कुणी मतदान करण्याचं जाहीर केलं हे माहीत नाही. इम्तियाज जलील यांचा आम्हाला फोन आला नाही. आदेशही आला नाही. फक्त आघाडीलाच मतदान करायचं हे ओवैसी यांनी आम्हाला सांगितलं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे एमआयएममध्ये समन्वय नसल्याचं सांगितलं जात आहे.

शाह-पवार यांची चर्चा

दरम्यान, फारूख शहा आणि अजित पवार यांची चर्चा झाली. यावेळी शाह यांनी राष्ट्रवादीला त्यातही खडसे यांना मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादीचं काही प्रमाणात टेन्शन दूर झाल्याचं दिसत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.