महाराष्ट्रात वादळातील नुकसानग्रस्तांना एनडीआरएफपेक्षा अधिक पटीने मदत : अजित पवार

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना मदत म्हणून अनेक घोषणा केल्या आहेत (Ajit Pawar on Nisarga Cyclone Affected Kokan).

महाराष्ट्रात वादळातील नुकसानग्रस्तांना एनडीआरएफपेक्षा अधिक पटीने मदत : अजित पवार

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना मदत म्हणून अनेक घोषणा केल्या आहेत (Ajit Pawar on Nisarga Cyclone Affected Kokan). आज (10 जून) कॅबिनेटच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या घोषणा करण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली. तसेच राज्य सरकारने एनडीआरएफपेक्षा अधिक पटीने नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा निर्ण घेतल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीबाबतही घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, “चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना नुकसान पोहचवलं आहे. यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र, राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. घरांची पडझड झाली त्यांना आता 95 हजार दिले जात आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरांना 15 हजार रुपये, झोडप्यांसाठी 6 हजार रुपये दिले जात होते, आपण 15 हजार रुपये देणार आहोत. स्थानिक दुकानदारांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत किंवा 75 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे.”

“फळबागांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये दिले जायचे, आपण हेक्टरी 50 हजार रुपये मदत देणार आहोत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ती मदत दिली जात आहे. एनडीआरएफने जाहीर केलेल्या मदतीच्या पुढे जाऊन राज्य सरकार मदत करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कापसाच्या प्रश्नावर देखील उपाययोजना केली जात आहे. शेतकऱ्यांचा सर्वच्या सर्व कापूस खरेदी करायचा असा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या मनात सारखी पावसात आपला कापूस भिजला तर नुकसानीची भीती होती. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी होणार आहे. या व्यतिरिक्त मका, चना आणि इतर दाळी यांचीही खरेदी केली जाईल”, असंही अजित पवार म्हणाले.

“पुरग्रस्तांच्या नुकसानीच्या थकीत रकमा तात्काळ देणार”

अजित पवार यांनी यावेळी मागील वर्षीच्या पुरात कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील काही नुकसानग्रस्तांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या तक्रारींचाही उल्लेख केला. ते म्हणाले, मागील वर्षीच्या पुरात झालेल्या काही नुकसानग्रस्तांना अद्यापही त्यांची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या नुकसानग्रस्ताचे पुराच्या नुकसानीचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना तात्काळ पैसे दिले जातील. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सुचना केल्या आहेत. यावर कॅबिनेटमध्येही निर्णय झाला आहे.

“कोकणवासीयांना त्यांच्या हक्काचं स्लॅबचं पक्कं घर देणार”

अजित पवार यांनी यावेळी कोकणवासीयांना पुन्हा वादळाचा फटका बसू नये म्हणून पक्के घरं देण्याचं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले, “मुंबई वाचली, मात्र कोकणात चक्रीवादळाने कोकणाला मोठा फटका बसला. त्यात कोकणातील घरांचं मोठं नुकसान झालं आहे. ही चक्रीवादळं येत राहणार आहेत. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना वादळाचा तडाखा बसू नये म्हणून हक्काचं पक्क स्लॅबचं घर दिलं जाईल. त्याचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक पाड्यांना देखील चक्रीवादळाचा फटका बसला. त्यांना खावटी मदत देण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. ती आर्थिक मदत अनुदान असेल, कर्ज नाही.”

वादळाचा फटका बसलेल्या भागात वादळाने वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालं आहे. ही यंत्रणा दुरुस्त करुन वीज येण्यासाठी पुढील 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात प्रत्येक रेशनकार्ड धारकाला मोफत लिटर रॉकेल दिले जाईल. तसेच तेथे प्रमुख आहार तांदूळ असल्याने त्यांना तांदूळही दिले जातील, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “पावसाळी अधिवेशन महत्त्वाचा काळ असतो. मात्र, कोरोनामुळे अधिवेशनाचे निर्णय बदलावे लागत आहेत. आजच्या बैठकीत पुरवणी मागण्या कशा पूर्ण करायच्या यावर निर्णय झाला. चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान केलं, मात्र या परिस्थितीत सतर्कता काय असते याची काळजी घेण्यात आली.”

हेही वाचा :

हवामान विभागाने मान्सूनचं वेळापत्रकच बदललं, पावसाळ्याचा हंगाम पुढे सरकत असल्याने निर्णय

वाढदिवसाला पत्नीने दोन ड्रेस शिवायला दिले, उरलेल्या कपड्यातून टेलरने मास्क बनवले, गुलाबरावांच्या मॅचिंग मास्कचं रहस्य

Circus remark | पवार म्हणाले आमच्याकडे विदुषकाची कमतरता, चंद्रकांत पाटील म्हणतात…..

Ajit Pawar on Nisarga Cyclone Affected Kokan

Published On - 4:48 pm, Wed, 10 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI