AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; घरीच क्वॉरंटाईन राहावे लागणार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Amit Thackeray gets discharged from lilavati hospital)

अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; घरीच क्वॉरंटाईन राहावे लागणार
अमित ठाकरे
| Updated on: Apr 24, 2021 | 4:06 PM
Share

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना लिलावतीत दाखल करण्यात आले होते. आता त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (Amit Thackeray gets discharged from lilavati hospital)

अमित ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने त्यांना चार दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांना 14 दिवस घरीच क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. अमित ठाकरे हे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सतत भेटत असतात. पक्षाच्या असंख्य कार्यक्रमांनाही हजेरी लावत असतात. कोरोनामुळे पक्षाचे कार्यक्रम बंद असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी होत होत्या.

कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत

अमित ठाकरे यांना सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतरांची चाचणी निगेटिव्ह आल्याचीही माहिती मिळालीय.

अमित ठाकरे कोण आहेत?

अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित ठाकरे यांनी रामनिरंजन आनंदीलाल पोदार कॉमर्स ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले असून, गेल्या वर्षी त्यांनी मिताली बोरुडेशी लग्न केले. या विवाह सोहळ्यामध्ये देश-विदेशातील दिग्गजांनी भाग घेतला होता. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे पुत्र अमित सध्या मनसेमध्येही सक्रिय आहेत. राज ठाकरे यांच्याप्रमाणेच अमित ठाकरे यांनाही मोकळ्या वेळेत स्केचेस बनवायला आवडतात.

राज्यात 24 तासात 66,836 रुग्ण आढळले

राज्यात गेल्या 24 तासात 66,836 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 74, 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण 34,04,792 झाली आहे. राज्यात सध्या एकूण 6,99,858 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34% झाले आहे. राज्यात सध्या 41, 88, 266 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर 29, 378 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर मुंबईत गेल्या 24 तासांत 7199 आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 6, 16, 279 वर गेली आहे. तसेच मुंबईत एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या 12,655 वर गेली आहे. (Amit Thackeray gets discharged from lilavati hospital)

संबंधित बातम्या:

मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

पाकिस्तानला फुकट लस देता, मग राज्याला 400 रुपये दराने का?, काँग्रेसचा सवाल

Corona Cases and Lockdown News LIVE : अमित ठाकरेंना डिस्चार्ज, कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने दिला डिस्चार्ज 

(Amit Thackeray gets discharged from lilavati hospital)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.