AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Mahindra Latest Tweet: आनंद महिंद्रा यांच्याकडून आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतूक; त्यांचे आभार मानेत म्हणाले….

आनंद महिंद्रा यांची उद्योगपती म्हणून ओळख असली तरी त्यांना दुसऱ्या एका कारणासाठी सध्या ओळखले जाते. ते म्हणजे त्यांच्या इंटरेस्टींग ट्विटसमुळे. त्यांनी आता महाराष्ट्रातील एका युवा मंत्र्याबाबत ट्विट करुन त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले आहे. त्या मंत्री महोदयांनीही त्यांना रिप्लाय देत त्यांचे आभार मानले आहेत. 

Anand Mahindra Latest Tweet: आनंद महिंद्रा यांच्याकडून आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतूक; त्यांचे आभार मानेत म्हणाले....
उद्योजक आनंद महिंद्रा यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे कौतूकImage Credit source: TV9
| Updated on: Apr 17, 2022 | 4:36 PM
Share

मुंबई: आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांची उद्योगपती म्हणून ओळख असली तरी त्यांना दुसऱ्या एका कारणासाठी सध्या ओळखले जाते. ते म्हणजे त्यांच्या इंटरेस्टींग ट्विटसमुळे. त्यांनी आता महाराष्ट्रातील एका युवा मंत्र्याबाबत ट्विट करुन त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले आहे. त्या मंत्री महोदयांनीही त्यांना रिप्लाय देत त्यांचे आभार मानले आहेत. ते मंत्री आहेत आदित्य ठाकरे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुंबई बस स्टॉपचा कायाकल्प केल्याबद्दल महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे महिंद्रा ग्रुपच्यावतीने (Mahindra Group) त्यांचे आभार मानले आहेत.

मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी आहे, त्या आर्थिक राजधानातील बस स्टॉपचा कायापलट केल्याबद्दल आणि त्याचे रुप बदलल्याबद्दल महिंद्रा यांनी आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच BMC चे कमिशनर इकबाल सिंग यांचीही प्रशंसा केली आहे.

जागतिक दर्जाचे बस स्टॉप

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करताना त्यांनी म्हटले आहे, शेवटी मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे बस स्टॉप असणार आहेत, व्यायामासाठी पर्याय असणार आणि त्याला थंड असे छप्पर असेल, ही या बसस्टॉपची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. हे पाहून खरचं खूप आनंद झाला आहे. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे आणि इक्बाल सिंग यांचेही त्यांनी कौतुक केले आहे.

वाहतूक व्यवस्था सुनिश्चित

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटसनंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिंद्रा ठाकरे यांच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले आहे की, ” आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या शहरासाठी आरामदायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करणे आणि डिझाइनच्या सुंदरतेबाबत अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा उद्देश्य आहे. आहे.यासाठीच आम्ही आमच्या बसच्या ताफ्यात एसी इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवत आहोत, आणि त्यांचा फायदा नागरिकांना व्हावा असा त्यांनी प्रतिसाद दिला आहे.

हिरवे छताविषयी थोडी शंका..

महिंद्रा आनंद यांच्या ट्विटसला अनेक युजर्सनी रिट्विट करत, आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या ट्विटला एका युजर्सने रिप्लाय देत म्हटले आहे की, “व्यायामची संकल्पना चांगली आहे. मात्र मला हिरवे छताविषयी थोडी शंका आहे. कारण हिरव्या छतासाठी पाणी कोण घालणार, आणि त्यांची काळजी कोण घेणार. त्यापेक्षा छतावर सौरपॅनेल लावले गेले तर वीज बचत होईल आणि त्यापासून इलेक्ट्रीक होर्डिंगही चालू शकतील, असा रिप्लायही देण्यात आला आहे.

सौर पॅनेलचा पर्याय चांगला

या ट्विटला रिट्विट करत आनंद महिंद्रा यांनी त्याला रिप्लाय दिला आहे की, ” हा चांगला प्रश्न आहे, याबाबत माझाही एक प्रश्न होता. या बस थांब्याला आणि उद्यानांच्या आजूबाजूच्या काही थांब्यावर हिरवे छत आणि साईड बार हवे आहेत, आणि राहिलेल्या मोकळ्या जागेत सौर पॅनेल बसवता येतील. त्यामुळे ट्विटचा मुख्य हेतूच हा होता की, आपल्या शहरातील बसथांबे हे स्वच्छ असले पाहिजे.

संबंधित बातम्या 

Sanjay Raut: दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, संजय राऊत यांचा मोठा आरोप

MLA Ravi Rana | अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर शाईफेक प्रकरण; राणा दाम्पत्य पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी जाणार

Narayan Rane: राणेंमागे पुन्हा शुक्लकाष्ठ; राज्याचे महसूलमंत्री असतानाच्या व्यवहाराची होणार चौकशी, प्रकरण काय?

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.