माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खुलं पत्रं, पाच मुद्द्यावर केला फोकस

अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज ईडीसमोर हजर राहिले. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खुलं पत्रं, पाच मुद्द्यावर केला फोकस
चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 4:08 PM

मुंबई: अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज ईडीसमोर हजर राहिले. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर त्यांनी एक पत्रंही पोस्ट केलं आहे. हे पत्रं कोणताही मंत्री, नेता, तपास यंत्रणा किंवा जनतेला उद्देशून नाही. मात्र या पत्रात चार मुद्द्यांवर फोकस केला आहे.

देशमुखांचं पत्रं जसंच्या तसं

मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझं आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखं आहे. त्यात काहीच लपवून ठेवलेलं नाही.

परंतु, माझ्यावर काही लोकांकडून आरोप झाले. ज्यांची काहीच नैतिकता किंवा विश्वासहार्यता नाही अशा लोकांनी माझ्यावर आरोप केले. काही तरी हितसंबंधातून हेतूपरत्वे हे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप खोटे आहेत. ज्या व्यक्तीने हे आरोप केला, तोच कर्तव्यावर असताना खंडणी वसूल करायचा. फ्रॉड करायचा आणि खुनाच्या गुन्ह्यातही असल्याचं दिसून येतं. तर माझ्यावर आरोप करणारा मुंबईचा माजी पोलीस आयुक्तच एका प्रकरणात फरार आहे.

भारतीय नागरिक म्हणून मी नेहमीच संविधानाचं पालन केलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21चा मी नेहमीच आदर केला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका सुनावणीसाठी असतानाही त्यापूर्वीच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे.

मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम दिलासा दिलेला आहे. माझी चौकशी सुरू असताना माझा वकील माझ्या सोबत राहील. वकिलाच्या समक्षच माझं म्हणणं नोंदवलं जाईल, तसेच जर गरज असेल तर मला अटकपूर्व जामीन देण्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

anil deshmukh letter

anil deshmukh letter

माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. यात कुणाचे तरी वेस्टेड इंट्रेस्ट आहेत. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करून ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याविरोधात सुरू असलेला प्रचार निराधार आहे. माझ्यावर झालेले आरोप हे निराधार आहेत. हे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझी चौकशी अत्यंत निष्पक्षपातीपणे होईल अशी आशा आहे. मी चौकशीला संपूर्णपणे सहाकार्य करेन, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच सत्यमेव जयते म्हणून त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.

संबंधित बातम्या:

‘फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीसमोर प्रकटले’, चंद्रकांत पाटलांचा टोला

मुस्लिम आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला ‘चलो मुंबई’, खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन

VIDEO: अजित पवारांकडून पत्नी, मुलगाच नव्हे आईच्याही खात्यात पैसे ट्रान्स्फर; किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खळबळ

(anil deshmukh open letter to public appeared before the ED)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.