अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्याच सुनावणी

परिवहन मंत्री अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली. अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितलं आहे.

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्याच सुनावणी
Anil Parab
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 5:42 PM

मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने (ED Notice) नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितलं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. (Anil Parab will be questioned by Lokayukta In case of purchase of ST ticket machine, after complaint by MLA Mihir Kotecha)

राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत राज्याच्या लोकायुक्तांकडून गुरुवारी (2 सप्टेंबर) रोजी सुनावणी होणार आहे. आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

कोटेचा यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्तांना या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे.

आमदार कोटेचा यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊन काळात आयटी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली असल्याने इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये तांत्रिक बदल करण्यात यावे‌त, असे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. त्यानुसार कंत्राटदाराच्या वार्षिक उलाढालीची अट 150 कोटींवरुन 100 कोटींवर आणण्यात आली. याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये आणखी काही बदल करण्यात आले. निविदा शर्तीमधील बदल संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवावेत, अशी सूचना महामंडळाचे व्यवस्थापक पांडुरंग राऊत यांनी केली होती. मात्र, परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आधी निविदा प्रसिध्द करावी व त्यानंतर संचालक मंडळाकडून त्यास मान्यता घ्यावी, असे आदेश काढले.

निविदा अटीतील बदल परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांच्या मर्जीतील गुजरातमधील एका विशिष्ट कंपनीला कंत्राट देण्यासाठी करण्यात आले आहेत, असा दावा कोटेचा यांनी केला आहे. बदललेल्या अटींनुसार निविदा मंजूर झाल्यास परिवहन महामंडळाला विनाकारण 250 कोटींचा भुर्दंड बसणार आहे. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी कोटेचा यांनी केली होती.

परिवहन विभागातील पदोन्नतीप्रकरणी चौकशी

परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाचीदेखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 सप्टेंबरला या प्रकरणाचीदेखील सुनावणी होणार आहे.

याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “मी चार महिन्यापूर्वी राज्यपालांकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने अनेक घोटाळे केले आहेत. त्यापैकी एक हा घोटाळा आहे. राज्यपालांनी लोकायुक्तांना त्याची चौकशी करण्यास सांगितलं होतं. आता चौकशी सुरु होत आहे. नवीन लोकायुक्त आलेले आहेत. उद्यापासून चौकशी होणार आहे. परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे हा अनिल परबांचा सचिन वाझे आहे. त्याच्या द्वारे एका एका बदलीसाठी 25 लाखापासून सव्वा कोटीपर्यंत वसूल केले. त्यामुळे ईडीने काल बजरंग खरमाटे यांच्या वास्तूंवर धाडी टाकल्या. किती शोरुम, किती फ्लॅट, किती बंगलो, इतकी संपत्ती आली कुठून? अनिल परबांची संपत्तीही आपण पाहात आहात. हा पैसा कुठून आणला? सचिन वाझेकडून की या बदल्यांमधून?” असा सवाल सोमय्यांनी केला.

बजरंग खरमाटेंवर ईडीच्या धाडी

परिवहन विभागात कार्यरत डेप्युटी आरटीओ दर्जाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी आणि काही ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली. परिवहन खात्यात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होती. त्यात खरमाटे यांचं देखील नाव होतं.

इतर बातम्या

निलेश राणेंची करेक्ट कार्यक्रमाची धमकी, राऊतांच्या सुरक्षेत वाढ, 6 शस्त्रधारी जवानांचं सुरक्षा कवच; घराला छावणीचं स्वरुप

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

(Shivsena leader Anil Parab will be questioned by Lokayukta In case of purchase of ST ticket machine, after complaint by MLA Mihir Kotecha)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.