AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बेस्ट’ची महिलांना भाऊबीज भेट; आजपासून मुंबईत धावणार आणखी 100 महिला स्पेशल बस

नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई 'बेस्ट'कडून भाऊबीजेच्या दिवशी महिलांना एक खास भेट देण्यात आली आहे. शनिवारी भाऊबीजेचा मुहूर्त साधत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या लेडीज स्पेशल सेवेचा लोकार्पण सोहळा पार  पडला.

'बेस्ट'ची महिलांना भाऊबीज भेट; आजपासून मुंबईत धावणार आणखी 100 महिला स्पेशल बस
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 3:17 PM
Share

मुंबई – नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई ‘बेस्ट’कडून भाऊबीजेच्या दिवशी महिलांना एक खास भेट देण्यात आली आहे. शनिवारी भाऊबीजेचा मुहूर्त साधत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या लेडीज स्पेशल सेवेचा लोकार्पण सोहळा पार  पडला. दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि बेस्टचे महा ववस्थापक लोकेश चंद्र यांची उपस्थिती होती.

मुंबईमध्ये लाखो महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात, अशा महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षीत व्हावा यासाठी बेस्टकडून लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  या उपक्रमांतर्गत आजपासून मुंबईत 100 लडेजी स्पेशल बस धावणार आहेत. मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची जगभरात ओळख आहे. बेस्ट बसेसने दररोज 30 लाख प्रवासी प्रवास करत असून यात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट उपक्रमाच्या 27 बस आगारातून मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील 100 बस मार्गावर ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बसेसमध्ये 90 बसेस या वातानुकूलित असणार आहेत. दरम्यान, सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या 37 महिला स्पेशल बस धावतात. त्यात आता या आणखी 100 बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या  137 झाली आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, महिलांचा प्रवस सुरक्षीत होण्यास मदत होणार असल्याची माहीत पेडणेकर यांनी दीली.

महापौरांची कोविड योद्ध्यांसोबत भाऊबीज 

दरम्यान त्यापूर्वी आज सकाळी मुंबई्च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी  भायखळा येथील महापौर निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या सहा कोविड योद्धे असलेल्या भावांसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला. तसेच आपल्या सर्व भावांना दीर्घायुष्य लाभू दे! अशी प्रार्थना देखील महापौरांनी केली. यामध्ये  वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.महारुद्र कुंभार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई दक्षिण विभागाचे महाप्रबंधक मनोज करे, बँक ऑफ महाराष्ट्र केंद्रीय कार्यालय पुणे येथील व्यवसाय बुद्धी विभागाचे उपमहाप्रबंधक अतुल जोशी, कालिदास कावले आणि भिवंडी येथील  शिवस्पर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरलाल फरमन यांना भाऊबीजेसाठी महपौर निवासस्थानी निमंत्रीत करण्यात आले होते.

हेही वाचा 

महापौर किशोरी पेडणेकरांनी साजरी केली भाऊबीज; मुंबईकरांना दिल्या शुभेच्छा

खंडणी वसुलीप्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच; 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

दाऊदच्या साथीदारासोबत अनिल देशमुख ‘सह्याद्री’त काय करत होते?; मोहित कंबोज यांचा सवाल

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.