Raj Thackeray : अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा; राज ठाकरेंनी सुनावले
Raj Thackeray on Urban Nasalism : मनसे अध्यक्ष यांनी शेकापच्या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा सरकारला अर्बन नक्षलवादावरून चोपलं. वाहनतळ आणि शहर नियोजन, विकासाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी सरकारचे महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. या भेटीबद्दल त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ही राजकीय भेट नव्हती तर शहर विकास, वाहनतळं आणि रस्त्यावरील पार्किंग याविषयावर सखोल चर्चा झाल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्बन नक्षलवादापेक्षा अशा मुद्यांवर लक्ष घालण्याचे सरकारला सुनावले. राज ठाकरे काय म्हणाले?
सर्वच गोष्टी फुकट मिळत नाहीत
पार्किंग, वाहनतळ विषयावर राज ठाकरे यांनी मत मांडले. गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंचा दर परवडायला हरकत नसेल. महिन्याला दोन तीन हजार असेल तरी तुमची गाडी सेफ राहते. रस्त्यावर त्रास देत नाही. सर्वच गोष्टी फुकट नाही मिळत ना, असे ते म्हणाले. समजा दादरला ८० ते ९० हजार स्क्वेअर फुटाचा भाव चालू आहे. रस्त्यावर तुमची गाडी किती स्क्वेअर फूट घेते. त्याचा भाव लावायचा का. असं होत नाही ना. त्यामुळे काही दर आकारला पाहिजे. नाही तर ट्रॅफिकची समस्या वाढेल. कशाचा पायपोस कशात नाही. ट्रॅफिकचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
रोज या शहरांवर माणसं आदळतात
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यातील अनेक शहरात परप्रांतियांचे लोंढे येत आहे. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. रोज या शहरात माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही. इमारती उंच होत आहे. सी लिंकला पार्किंगचा लॉट केला होता. काही प्रेशरने काढायला लावला. आमच्यासमोर पार्किंग नको असं धनदांडग्यांनी सांगितलं. तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय? माणसं येणारी थांबवली पाहिजे. बाहेरची राज्य डेव्हल्प केली पाहिजे. पण त्यातल्या त्यात हे हातात आहे ते करायला पाहिजे, असे मनसे अध्यक्षांनी सुचवले.
अर्बन नक्षलपेक्षा इथं लावा शिस्त
अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचं आहे, असे राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले. शहर विकास आणि पार्किंग प्रश्नावर त्यांनी मुद्देसुद भूमिका मांडली. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे. काय होणार आहे धारावीत. कोणते रस्ते होणार आहे. पुण्यासारखी परिस्थिती आहे. पुण्यात जाऊन बघा. थायलंडला जाऊन बघा. फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला वाहने नियंत्रित कराव्या लागतील, असे राज ठाकरे म्हणाले.
राज यांची मोठी भूमिका
बाहेरून आलेल्या लोंढ्यांमुळे अनेक गोष्टी उभ्या राहिल्या. अनेक प्रॉब्लेम झाले. प्रयागराजची लोकसंख्या ४० लाख लोक राहतात. काही कोटी गेले तर काय होईल. तिथे जाऊन परत आले. इथे तर राहतात, या शहरांचं काय होणार?, असा खडा सवाल त्यांनी केला. आपल्याकडे कायदे आहेत. लॉ अँड ऑर्डर म्हणतो ना. लॉ आहे पण ऑर्डर नाही. हा विषय गंभीर आहे. हेच सरकारमध्ये होत नाही ना. आपल्याकडे डीपी बनतो पण टीपी नाही बनत. टाऊन प्लानिंग होत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
