ठाकरे सरकारच्या मदतीनं परमबीर सिंग गायब, आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप

भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेला कसा याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मलिक यांना दिलं आहे.

ठाकरे सरकारच्या मदतीनं परमबीर सिंग गायब, आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 11:43 AM

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेला कसा याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मलिक यांना दिलं आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना, असं शेलार म्हणाले. महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करतंय, असा धक्कादायक आरोपही आशिष शेलार यांनी केलाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय असं शेलार म्हणाले. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, असा दावा शेलार यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव

संजय राऊत यांच्या पत्नी आमच्या वहिनी आहेत. आम्हाला कुणाच्याही पत्नी आणि मुलांबद्दल आक्षेप नाही.माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बदनाम करणे हा बदनामीचा कार्यक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

नवाब मलिकांची नार्को टेस्ट करायला पाहिजे

नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले. या सर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी, असंही आशिष शेलार म्हणाले. जे मंत्री सरकारची ढाल पूढे करून पोलीस यंत्रणा समोर जात नाही आहेत. कोर्टात जात नाही त्यामुळे नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना समान न्याय राज्य सरकारने न्याय द्यायला हवा नाहीतर अस होईल की सरकारचा या कटकारस्थानात सहभाग आहे, असा समज होईल असं आशिष शेलार म्हणाले.

इतर बातम्या:

समीर वानखेडेंना चारित्र्याचं सर्टिफिकेट देणं भाजपचं काम नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

शिवसेना आमदार सुहास कांदे – अक्षय निकाळजे यांचा जबाब आज पोलीस आयुक्त नोंदवणार

Ashish Shelar accused MVA Government helped Parambir Singh to fly from India

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.