मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय?; राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलार संतप्त

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा मतदारसंघ असलेल्या मालवणीत रामजन्मभूमीचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप नेते आशिष शेलार प्रचंड संतापले आहेत. (ashish shelar slams congress over ram janmabhoomi poster)

मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय?; राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलार संतप्त
आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबई: मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा मतदारसंघ असलेल्या मालवणीत रामजन्मभूमीचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप नेते आशिष शेलार प्रचंड संतापले आहेत. मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय? असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar slams congress over ram janmabhoomi poster)

आशिष शेलार यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी हिंदू, दलित कुटुंबांवर घर सोडण्याचा दबाव आणला गेला होता. आता रामजन्मभूमीचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

प्रभू रामाचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहणार. जनतेच्या सहभागातून आणि समर्पणातून उभे राहणार. त्यासाठी मुंबईतील मालवणीतूनही मोठ्या प्रमाणावर निधी संकलित होणार आहे. पाहू कोण रोखते ते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, मालवणीत राम जन्मभूमीचे काही पोस्टर फाडण्यात आले होते. त्यावरून राजकारण पेटलं असून या पार्श्वभूमीवर शेलार यांनी टीका केली आहे.

राज्यपालांकडून एक लाख

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी काल शुक्रवारी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिला. नागपुरात कालपासून निधी संकलनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. राम फक्त राम नाही. तर आमच्या सर्वांसाठी एक राष्ट्र आहे. खूप मोठ्या संघर्षानंतर आम्ही राम मंदिर बनवत आहोत. मात्र, संकल्प अजून अपूर्ण आहे. आपल्याला देशात राम राज्य आणायचे आहे. देश एका योग्य दिशेने चालला आहे. प्रत्येक घरात जाऊन योगदान घ्यायचे आहे. भव्य दिव्य राम मंदिर तयार होणार असून यात सगळ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं.

रामशेठ ठाकूर यांच्याकडून एक कोटी

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पनवेलचे संघचालक प्रशांत कोळी यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, पनवेलमधील ५२ दानशूर व्यक्तींनीही यावेळी राम मंदिर उभारणीसाठी धनादेश दिल्याची माहिती देण्यात आली. (ashish shelar slams congress over ram janmabhoomi poster)

 

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरण मोहीम सुरु, पहिल्या लसीच्या मानकरी कोण?

अजित पवार साहेब, भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमेंड उतरवेन, निलेश राणेंचा हल्लाबोल

धनंजय मुंडे ओबीसी नेते, राष्ट्रवादीला काय सूचवायचंय?; भाजपची कोंडी?

(ashish shelar slams congress over ram janmabhoomi poster)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI