AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या; शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर

शनिवारी रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे शनिवारी रुग्णालयात सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.

बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या; शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर
Shilpa Shetty, Raj KundraImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2024 | 9:52 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल समजताच अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी, संजय दत्त यांसारखे सेलिब्रिटी शनिवारी रात्रीच लिलावती रुग्णालयात पोहोचले. पापाराझी अकाऊंटवर या सेलिब्रिटींचे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये शिल्पाला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी रात्री शिल्पा तिचा पती राज कुंद्रासोबत लिलावती रुग्णालयात पोहोचली. यावेळी ती तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसली. कारमध्ये बसली असतानाही शिल्पाला रडू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफर्स आणि पत्रकारांना त्यांच्याभोवती घोळका गेला. या घोळक्यातून राज तिला पुढे नेण्यास मदत करतो. यावेळीही शिल्पा प्रचंड दु:खी असल्याचं पहायला मिळालं. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालसुद्धा बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत मैत्रीपूर्ण नातं होतं. त्यांच्याकडून आयोजित होणाऱ्या इफ्तार पार्टीत इंडस्ट्रीतील असंख्य सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित राहतात.

सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढत असलेल्या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.

मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया यांनी दोन संशयितांच्या अटकेची माहिती दिली. “निर्मलनगरमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. गोळी लागल्यानंतर सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे”, असं दहिया यांनी सांगितलं. या गुन्ह्यात वापरलेलं हत्यारही जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. गोळीबारात 9.9 मिमी पिस्तूल वापरण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.