PHOTO : महालक्ष्मी एक्सप्रेस पूराच्या पाण्यात अडकली, युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात

PHOTO : महालक्ष्मी एक्सप्रेस पूराच्या पाण्यात अडकली, युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात

बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले आहेत.

Namrata Patil

|

Jul 27, 2019 | 2:52 PM

बदलापूर : ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अबंरनाथ नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काल संध्याकाळपासून नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. या पूराचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसला बसला आहे.

बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे.

या एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

एनडीआरएफ, पोलीस प्रशासनापासून इतर सामाजिक संस्थांकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

प्रवाशांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर रवाना

आतापर्यंत 500 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश, तसेच 9 गर्भवती महिलांनाही बाहेर काढण्यात यश

तब्बल 12 तासानंतर एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या लोकांना बचावासाठी एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाकडून बचावकार्य करण्यात आले आहे.

उल्हास नदीला पूर, आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती

महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे टिपलेली काही दृष्य

एनडीआरएफच्या जवानांचे युद्धपातळीवर बचावकार्य

संबंधित बातम्या : 

बदलापूर, नवी मुंबईत कोसळधार, महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अनेक प्रवासी अडकले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें