Video: त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल

राज्यात सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होतोय.

Video: त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 17, 2021 | 12:11 AM

मुंबई : मुंबईतल्या शिवसेनाभवन बाहेर आज (16 जून) भाजप आणि शिवसेनेत चांगलाच राडा झाला. राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यावर भाजपला शिवसेनेनं घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत त्यावर रोज सवाल करतायत. शिवसेनेचे सवाल म्हणजे राम मंदिराला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मुंबई भाजपचे नेते करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या युवा आणि महिला कार्यकर्त्यांनी थेट शिवसेना भवनवर मोर्चा काढला (Balasaheb Thackeray old speech viral after fighting between Shivsena BJP activist in Mumbai).

आंदोलन केलं. घोषणाबाजी केली. त्याच वेळेस तिथं शिवसेनेच्याही काही महिला पोहोचल्या. काही शिवसैनिक पोहोचले. पोलीसही होते. बघता बघता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. राज्यात सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशी हाणामारी होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. आता राडा संपला आहे पण आरोप प्रत्यारोप होतायत, नवीन व्हिडीओ समोर येत आहेत.

आता त्यातच बाळासाहेबांच्या भाषणातला एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही ट्विट केला आहे. त्या व्हिडीओत सच्चा शिवसैनिक कोण असतो हे बाळासाहेब सांगतायत. तो व्हिडीओ तुम्ही नक्की बघा. कारण हाच व्हिडीओ शिवसैनिकांना आरेला कारे करण्याची प्रेरणा देत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

किशोरी पेडणेकर यांनी शेअर केलेला बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ पाहा :

संबंधित बातम्या :

VIDEO: शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, सेना भवनसमोर राडा; अनेकांची धरपकड!

PHOTOS : राम मंदिर जमीन घोटाळ्यावरुन सेना भवनासमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी

Video | कायदा सुव्यवस्था बिघडल्यास शिवसेना जबाबदार – प्रवीण दरेकर

व्हिडीओ पाहा :

Balasaheb Thackeray old speech viral after fighting between Shivsena BJP activist in Mumbai

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें