…. तर मुंबईचं महापौरपद काँग्रेसकडेच, बाळासाहेब थोरातांनी दंड थोपटले

आघाडीतील तिन्ही पक्षांमधून स्वबळाचीही भाषा येऊ लागलीय. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आगामी मुंबई महापौर काँग्रेसचाच असेल असं म्हणत दंड थोपटले आहेत.

.... तर मुंबईचं महापौरपद काँग्रेसकडेच, बाळासाहेब थोरातांनी दंड थोपटले


मुंबई : राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका आघाडीने एकत्र लढवल्या आणि चांगलं यशही मिळवलं. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हि तिन्ही पक्ष आघाडी म्हणून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकाही एकत्र लढेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता आघाडीतील या तिन्ही पक्षांमधून स्वबळाचीही भाषा येऊ लागलीय. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आगामी मुंबई महापौर काँग्रेसचाच असेल असं म्हणत दंड थोपटले आहेत (Balasaheb Thorat claim that next Mumbai Mayor will be of Congress).

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत. नसीम खान यांना सांगतो काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू.”

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा‌ महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

अशोक चव्हाण म्हणाले, “भाजपला थांबवण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. आघाडी सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवरच चालेल. सोनिया-राहुल गांधी यांच्या विचार आणि भूमिकेवर सरकार चालेल.” अशोक चव्हाण यांनी यावेळी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराही दिला. भाजपचा “सामाना” करायचा आहे हे विसरू नका. अन्यथा, दोन हात सामना आम्हीही करू. भाई जगताप तुम्ही दोन हात करायला कमी पडू नका, आम्ही ताकद देवू, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

हेही वाचा :

विदर्भच काँग्रेसला दिशा देईल, थोरातांच्या उपस्थितीत वडेट्टीवारांचं वक्तव्य

वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेला शिवसेना उमेदवार वडेट्टीवारांच्या उपस्थितीतच काँग्रेसमध्ये

उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

व्हिडीओ पाहा :

Balasaheb Thorat claim that next Mumbai Mayor will be of Congress

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI