AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे | Jalyukt shivar scheme

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल
| Updated on: Oct 15, 2020 | 11:42 AM
Share

मुंबई: सरकार तुमचं आहे. तुम्ही दोषींवर कारवाई करू शकता. पण वस्तुस्थिती काय आहे हे पाहा, असं सांगतानाच जलयुक्त शिवाराचं काम पूर्ण होण्यासाठी मोठा जनसहभाग होता. गावागावात कामे झाली. आता या जनसहभागाचीही चौकशी करणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil on Jalyukt shivar scheme SIT probe)

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. याशिवाय, ‘कॅग’च्या अहवालातही जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ‘कॅग’च्या अहवालातील सर्व आरोप फेटाळून लावले. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. या योजनेमुळे जमिनीखालील पाणीसाठी वाढला. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. परिणामी शेतकरी दोन-दोन पिकं घेऊ लागले होते, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासही सुरुवात केली. तर औरंगाबाद आणि जालना यासारख्या भागात लागणाऱ्या पाण्याच्या टँकर्सची संख्याही घटली होती.

मात्र, ‘कॅग’च्या अहवालात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला नाही. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत संपूर्ण राज्यभरात एकूम 6,41,560 कामे झाली. परंतु, ‘कॅग’कडून यापैकी फक्त 1128 कामंच तपासण्यात आली. ही टक्केवारी अवघी 0.17 टक्के इतकी आहे. एकूण 22589 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना पोहोचली असताना केवळ 120 गावांच्या पाहणीवरून योजनेचे मूल्यमापन कसे काय होऊ शकते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

‘शिवार’ जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले? रोहित पवारांचा भाजपला टोला

ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी ₹ खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली, याची चौकशी होण्याची गरज होती. राज्य सरकारने योजनेच्या चौकशीचे आदेश दिल्यामुळे ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला.

संबंधित बातम्या:

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला

Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!

(Chandrakant Patil on Jalyukt shivar scheme SIT probe)

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.