होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध: भातखळकर

हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी. | Atul Bhatkhlkar Holi 2021

होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध: भातखळकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 3:17 PM

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने होळी (Holi 2021) आणि धुलीवंदनाच्या सणावर लादलेल्या निर्बंधांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले. होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध, अशी टीका त्यांनी केली. (BJP leader Atul Bhatkhlkar slams Thackeray govt)

त्यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे. शब-ए-बारातला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन मुंबई अतुल भातखळकर यांनी केले.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकार मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर यांनी दिले.

‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का; आम्ही होळी घरामध्ये पेटवायची का?’

ठाकरे सरकार फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का करते, असा सवाल भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण (Holi 2021) साजरा करण्यात काय गैर आहे? इतर धर्माच्या लोकांच्या सणांना परवानगी दिली जाते. ते लोक कोरोनाचे नातेवाईक आहेत का, याचे उत्तर वसुली सरकारने द्यावे, अशी टीका राम कदम यांनी केली.

राम कदम यांनी रविवारी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.

(BJP leader Atul Bhatkhlkar slams Thackeray govt)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.