5

सरकारचाच फ्यूज उडालाय, जनता धडा शिकवेल : चित्रा वाघ

जनता नक्की धडा शिकवेल," अशी टीका चित्रा वाघ यांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर केली. (Chitra Wagh Comment On Electricity Bill Issue) 

सरकारचाच फ्यूज उडालाय, जनता धडा शिकवेल : चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:44 PM

कल्याण : “सरकारचाच फ्यूज उडाला आहे. अनेक लोकांना 50 हजारांपेक्षा जास्त वीजबिलं आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल,” अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर केली. (Chitra Wagh Comment On Electricity Bill Issue)

अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरातील हळदी कुंकू कार्यक्रमात चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

“सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जी वेळ दिली ती फार चुकीची आहे. अनेकांचे ऑफिसेस हे दहाला सुरू होतात. संध्याकाळी बंद होतात. त्यामुळे सरकारने लोकलच्या वेळेमुळे नोकरदार वर्गाला काहीही फायदा होणार नाही,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

यावेळी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना आमदार होण्याच्या शुभेच्छा चित्रा वाघ यांनी दिल्या. मात्र कोणत्या पक्षातून कुणाल पाटील यांनी आमदार व्हावं, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला असता त्या म्हणाल्या, कुणाल पाटील हे स्वत: प्रगल्भ आहेत. त्यामुळे ते त्यांचा निर्णय स्वत: घेतील, असे त्यांनी म्हटले.

नोटिशीची मुदत 30 जानेवाराली संपणार

ग्राहकांनी वीजबिल न दिल्यामुळे महावितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महसुली तूट वाढल्यामुळे महावितरणला आपला कारभार करण्यासाठी कसरत करावी लागतीये. त्यामुळे सरकारने थकित वीजबिलाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल 71 लाख 68 हजार 596 विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आले आहे.

वीजबिल न भरल्यास वीज कापणार

निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास विजजोडणी कापण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. वीजबिल भरण्यासाठीची मुदत 30 जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर विजेची जोडणी कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत.  (Chitra Wagh Comment On Electricity Bill Issue)

संबंधित बातम्या : 

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

‘मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला’, विनायक राऊतांचा टोला

Non Stop LIVE Update
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'