शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म; भाजपच्या माजी खासदाराची खोचक टीका

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधान केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांची ट्विटरवरून जुंपली आहे.

शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म; भाजपच्या माजी खासदाराची खोचक टीका
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 11:51 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर येथील दंगलीवरून राज्य सरकारला चांगलच फटकारलं होतं.औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण आहे? त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्याचं कारण काय आहे? फोटो दाखवला त्यातून काय परिणाम होतो? कुणाला पडलंय त्याचं? असा सवाल शरद पवार यांनी केला होता. पवार यांच्या या विधानावर भाजपच्या एका माजी खासदाराने खोचक शब्दात टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे यांच्या या टीकेवर भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

निलेश आणि नितेश यांच्यावर टीका

निलेश राणे यांनी टीका केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. ही टीका करताना मिटकरी यांनी आमदार नितेश राणे यांचा दर्ग्यावर माथा टेकवतानाचा फोटोही शेअर केला आहे. आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तू नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा. पहिला नेपाळ, दुसरा चीन आणि नंतर कोकणात. तू तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस! तुला भाजपने तुकडा टाकलाय तो यासाठीच, अशी खरमरीत टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

पवार का म्हणाले?

औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत एका तरुणाने औरंगजेबाचा फोटो नाचवत डान्स केला होता. त्यावरून कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारत प्रचंड निदर्शने केली. काल कोल्हापुरातील शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी जमाव प्रचंड आक्रमक झाला होता. या जमावाला पांगवताना पोलिसांनी लाठीमार करताच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे जमाव अधिकच आक्रमक झाला. काही लोकांनी पोलिसांच्या दिशने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी या जमावाला प्रचंड चोप दिला. त्यामुळे अनेकांची पळापळ सुरू झाल्याने आफरातफर माजली.

पोलिसांनी अवघ्या काही तासातच परिस्थिती नियंत्रणात आणली. कोल्हापुरातील चौकाचौकात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच कोल्हापुरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. अफवा पसरू नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.