AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya: खुल्या जागेवरील कुर्बानीवर लावा रोख….बकरी ईदपूर्वीच किरीट सोमय्या आक्रमक… BMC कडे केली मोठी मागणी

Kirit Somaiya on Bakri Eid: बकरी ईदपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी खुल्या जागेवरील बकऱ्यांच्या कुर्बानीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याविषयीचे पत्र मुंबई महानगरपालिकेला लिहिले आहे. त्यामुळे यावेळी अशा उघड्यावरील कुर्बानीवर कारवाई होणार की राजकारण तापणार अशी चर्चा होत आहे.

Kirit Somaiya: खुल्या जागेवरील कुर्बानीवर लावा रोख....बकरी ईदपूर्वीच किरीट सोमय्या आक्रमक... BMC कडे केली मोठी मागणी
खुल्या जागेवरील कुर्बानीला विरोधImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 17, 2026 | 2:43 PM
Share

Kirit Somaiya on Bakri Eid: बकरी ईद तसेच इतर प्रसंगी मुंबईत सोसायट्या, चाळी आणि खुल्या जागांमध्ये होणाऱ्या बकऱ्यांच्या कत्तलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात सोमय्या यांनी महापौरांना पत्र लिहिले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खुल्या जागेतील बकऱ्यांच्या कत्तलीवर कारवाईची मागणी या पत्राद्वारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

बकरी ईदच्या निमित्ताने काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली जाते. महानगरपालिका आणि न्यायालयाने याबाबत वेळोवेळी निर्बंध घालूनही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईतील कोणत्याही वस्ती किंवा निवासी परिसराच्या जवळ बकऱ्यांचे बलिदान किंवा कत्तल कायद्यानुसार करता येत नाही, असे नमूद करत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. तसेच महानगरपालिकेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, यावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

बकरी ईद 27 मे रोजी?

यंदा बकरी ईद 27 मे 2026 रोजी होण्याची शक्यता आहे. अर्थात चंद्र दर्शन होईपर्यंत ही तारीख निश्चित मानली जात नाही. या मुस्लिम सणापूर्वी प्रशासनाने त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदचे विशेष महत्त्व आहे. महापालिकेने मुंबईत 109 ठिकाणी कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

देवनार कत्तलखान्यात सुविधा

या महिन्याच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बकरी ईदच्या निमित्ताने देवनार कत्तलखान्यात विविध सोयी-सुविधा देण्यास सुरूवात केली. आतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. आश्विनी जोशी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, कत्तलखाने CCTV देखरेखी खाली असतील. याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतील. पार्किंग, फूड कोर्ट, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे.

BMC नुसार 17 मे ते 30 मे दरम्यान देवनार कत्तलखान्यात बकरी आणि म्हशींचा विशेष बाजार भरवला जाईल. तर 28 ते 30 मे दरम्यान मुंबईतील 109 जागांवर धार्मिक पशूबळी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने 24 तास कंट्रोल रूम, QR कोड आधारीत पशू पडताळणी प्रक्रिया, अस्थायी शेड, पशू वैद्यकीय सुविधा आणि 500 हून अधिक पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. याशिवाय यावेळी MyBMC मोबाइल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन परवानगी आणि स्लॉट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?