129 कोटींचं काम 500 कोटींवर नेणारा महापालिकेतील ‘वाझे’ कोण? भाजप आमदाराचं इक्बाल चहलना पत्र

चौकशी करा आणि जो कोणी मुंबई महापालिकेतील 'सचिन वाझे' आहे, त्याच्यावर कारवाई करा, असं पत्र भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना लिहिलं आहे.

129 कोटींचं काम 500 कोटींवर नेणारा महापालिकेतील 'वाझे' कोण? भाजप आमदाराचं इक्बाल चहलना पत्र
Iqbal Chahal, Rahul Narvekar

मुंबई : “129 कोटींचं काम 500 कोटींवर नेऊन ठेवणारा महापालिकेतील ‘सचिन वाझे’ कोण?” असा सवाल भाजप आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांना विचारला आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट होत आहे, असा आरोप नार्वेकरांनी केला आहे. राहुल नार्वेकर यांनी बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिलं आहे.

काय आहे पत्र?

129 कोटींचं काम 500 कोटींवर नेऊन ठेवणारा महापालिकेतील ‘सचिन वाझे’ कोण? आहे. निविदा काढताना 129 कोटींची मात्र वाढीव काम दाखवत खर्च नेला 500 कोटींवर, खर्च वाढल्यास इतर कामांच्या निविदा न काढता रकमेतील निधींची फेरफार केली का? हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. जनतेच्या पैशांचा चुराडा होत असताना पाहत राहणारी मुंबईकर जनता एवढी दुधखुळी नाही, संबंधित प्रकरणाची चौकशी करा आणि जो कोणी पालिकेतील ‘सचिन वाझे’ आहे, त्याच्यावर कारवाई करा, असं पत्र भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना लिहिलं आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

सचिन वाझेशी तुलना का?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होता, त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप आहे.

अग्निसुरक्षा शुल्कावरुनही वाझेची उपमा

याआधीही, मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला होता. मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षा शुल्क आकारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आमनेसामने आले होते. बीएमसीमध्ये अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता.

नितेश राणेंकडून दिनो मोरियाची वाझेशी तुलना

अभिनेता दिनो मोरिया याच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. दिनो मोरिया (Dino Moria) हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. या प्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

दिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचं सूचक विधान

बीएमसीच्या अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? भाजप आमदार अमित साटम आक्रमक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI