रेल्वे, संसदीय कार्यसह सर्व समित्यांचे तडकाफडकी राजीनामे; गोपाळ शेट्टी यांची फेसबुक लाईव्हवरून मोठी घोषणा

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी होत असतानाच भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (bjp mp gopal shetty resignation all parliamentary committees)

रेल्वे, संसदीय कार्यसह सर्व समित्यांचे तडकाफडकी राजीनामे; गोपाळ शेट्टी यांची फेसबुक लाईव्हवरून मोठी घोषणा
gopal shetty
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 5:40 PM

मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी होत असतानाच भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांनी संसदीय कार्य, रेल्वे आणि हाऊस समितीसह सर्व संसदीय समित्यांचे राजीनामे दिले आहेत. गोपाळ शेट्टी यांनी फेसबुक लाईव्हवरून तशी घोषणाच केली आहे. (bjp mp gopal shetty resignation all parliamentary committees)

गोपाळ शेट्टी यांनी आज फेसबुक लाईव्ह करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. संसदीय कार्य समिती, रेल्वे समिती आणि हाऊस समितीसह सर्व समित्यांचा आपण राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे हे राजीनामे पाठविले असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

शेट्टी संतप्त

मागच्या अनेक वर्षांपासून खासदार शेट्टी हे झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना पक्के घर लवकरात लवकर मिळावे यासाठी झटत आहेत. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन संशोधित कायदा केला. परंतु आजपर्यंत या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालं नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच डॉ. योगेश दुबेंमार्फत मानव अधिकार आयोगापर्यंत शेट्टी यांनी पाठपुरावा केला. मात्र, अजूनपर्यंत 2017च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत. तसेच या ठिकाणी पहिल्या माळ्यावर राहणाऱ्यांना सशुल्क घर मिळण्यासाठीही कोणते ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी केल्या, प्रशासनिक समित्याही नेमण्यात आल्या. पण कोणतीच कार्यवाही होत नसल्याने शेट्टी संतप्त झाले आहेत. त्यामुळेच या कामाला पुढील वेळ देण्यासाठी सर्व समित्यांचे राजीनामे दिले आहेत.

लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे

श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जोडीने देशासाठी भरीव योगदान दिलं. त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याही पदाचा नीट उपयोग झाला पाहिजे असे मला वाटते. त्यामुळेच लोकांच्या प्रश्नाला पूर्णवेळ वेळ देता यावा म्हणून मी या समित्यांचा राजीनामा देत आहे, असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

मोदींचं स्वप्न पूर्ण करायचंय

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी प्राण दिले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न मार्गी लावला. सर्वांना पक्के घर मिळावं हे मोदींचं स्वप्न आहे. त्यासाठीच मी संघर्ष करत आहे. त्यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा प्रल्हाद जोशींकडे पाठवला आहे. समित्यांचा मी दिलेला राजीनामा ते स्वीकारतील अशी आशा व्यक्त करतो, असं ते म्हणाले. यावेळी शेट्टी यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही मनमोकळेपणाने उत्तरं दिली. (bjp mp gopal shetty resignation all parliamentary committees)

संबंधित बातम्या:

अन् मरणाच्या दारातून परतलो; जळगावच्या ओबीसी परिषदेत भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण!

VIDEO: आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, देवेंद्र फडणवीसांचं माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठं विधान

दानवे निवडून कसे आले?, खोतकर काय म्हणाले?; रावसाहेब दानवेंनी सांगितला निवडणुकीचा अफलातून किस्सा

(bjp mp gopal shetty resignation all parliamentary committees)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.