कोस्टल रोडचं काम थांबल्यानं दररोज 10 कोटींचं नुकसान, बीएमसी सर्वोच्च न्यायालयात

उच्च न्यायालयानं कोस्टल रोडचं काम तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिल्यानं दररोज 10 कोटींचे नुकसान होत असल्याचं मुंबई महानगरपालिकेने (बीएससी) म्हटलं आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोस्टल रोडचं काम थांबल्यानं दररोज 10 कोटींचं नुकसान, बीएमसी सर्वोच्च न्यायालयात
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 11:59 AM

मुंबई: उच्च न्यायालयाने कोस्टल रोड या मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक सर्व परवानग्या रद्द केल्या. यानंतर आता पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परवानग्या रद्द केल्यामुळे प्रकल्पाचे काम थांबले आहे. यामुळे दररोज 10 कोटींचे नुकसान पालिकेला सोसावे लागत असल्याचा पालिकेने दावा केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश देताना या प्रकल्पामुळे समुद्र किनाऱ्यावरील नैसर्गिक साधन संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे नमूद केले होते. या प्रकल्पामुळे कोळी बांधवांच्या रोजगारावरही मोठा परिणाम होईल, असंही न्यायालयाने म्हटल्याचं कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी सांगितले होते. न्यायालयाने अनेक आक्षेप घेत कोस्टल रोडचा हा प्रकल्प रद्द केला. शिवसेनेने हा प्रकल्प मुंबईसाठी महत्वाचा असल्याचे म्हणत या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची मोठी निराशा झाली.

श्वेता वाघ यांनी कोस्टल रोड प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं कोस्टल रोडला मिळालेली सीआरझेड (CRZ) परवानगी रद्द केली होती. यावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितलं.

कोस्टल रोड प्रकल्प काय आहे?

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.

हा रोड मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 9.98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल रोडवर 1650 वाहनं पार्किंगची सोय असेल. याच्या बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार आहेत. कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.

कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?

  • साडे सहा किलोमीटरचे बोगदे
  • आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
  • सिग्नल फ्री मार्ग
  • 34 % इंधन बचत होणार
  • 1650 वाहन पार्किंगची सोय
  • 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
  • माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
  • 4 वर्षाचा कालावधी
  • 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
  • पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.