शिवसेनेविरोधात भाजपचे नगरसेवक एकवटले, मुंबई महापालिका मुख्यालयासमोर अनोखं आंदोलन

शिवसेनेविरोधात भाजपचे नगरसेवक एकवटले, मुंबई महापालिका मुख्यालयासमोर अनोखं आंदोलन

शिवसेनेला त्यांच्या वचणांची आठवण करून देण्यासाठी भाजपचे नगरसेवक मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर एकवटले. त्यांनी सर फिरोजशाह मेहता पुतळ्यासमोर शिवसेनेविरोधात मूक निदर्शने दिली (BMC BJP Corporaters protest against ShivSena)

चेतन पाटील

|

Feb 23, 2021 | 5:02 PM

मुंबई : शिवसेना मुंबई महापालिकेच 1996 ते 2021 अशी सलग 25 वर्षांपासून महापौरपदी विराजमान आहे. सत्ताधारी शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत मुंबईकरांसाठी अनेक वचणं दिली. मात्र, प्रत्यक्षात ती वचण पूर्ण केली नाहीत, असा दावा भाजप नगरसेवकांनी केला आहे. शिवसेनेला त्यांच्या वचणांची आठवण करून देण्यासाठी भाजपचे नगरसेवक मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर एकवटले. त्यांनी सर फिरोजशाह मेहता पुतळ्यासमोर शिवसेनेविरोधात मूक निदर्शने दिली (BMC BJP Corporaters protest against ShivSena)

भाजप गटनेते प्रभाकर शिंदे आक्रमक

“पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांमध्ये ‘जे बोलतो ते करतो’ असे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, तब्बल २५ वर्ष उलटूनही मुंबईकरांच्या हाल-अपेष्टा संपलेल्या नाहीत. मात्र याचवेळी धनदांडग्यावर करामध्ये सवलतींचा वर्षाव करत महापालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. दि. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर १६ वर्षांत वीस हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपये पुरनियंत्रणासाठी खर्च केल्यानंतरही व दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होते”, अशा शब्दात भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी निशाणा साधला.

भाजपच्या ‘या’ नगरसेवकांचा आंदोलना सहभाग

सर्वसामान्य मुंबईकराच्या भावनेशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मुंबईकर जनताच धडा शिकवेल अशी सडकून टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केली. या मूक आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, अभिजित सामंत, अतुल शाह, नगरसेविका शितल गंभीर–देसाई, समिता कांबळे, नेहल शाह, कृष्णावेनी रेड्डी, सुरेखा लोखंडे, व अन्य नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

भाजपच्या दाव्यानुसार शिवसेने नेमक्या कोणत्या वचणांची पूर्तता केलेल नाही?

“पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, सातशे चौरस फुटापर्यंत मालमत्ता करात सवलत, खड्डे विरहीत रस्ते, तुंबई मुक्त मुंबई, 24 × 7 तास पिण्याचे पाणी, दर्जेदार रुग्णालये, बेस्ट उपक्रमाचे विलिनीकरण, डबेवाला भवन, मराठी शाळा दर्जोन्नती, मराठी भाषा विभाग अशा अनेक आश्वामसनांचा सत्ताधारी महाविकास आघाडीला विसर पडला आहे”, असे प्रतिपादन भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केले (BMC BJP Corporaters protest against ShivSena).

हेही वाचा : 7 वर्षांनी मैदानात उतरलेल्या श्रीशांतचा धमाका, विजय हजारे ट्रॉफीत एकट्याने निम्मा संघ माघारी धाडला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें