7 वर्षांनी मैदानात उतरलेल्या श्रीशांतचा धमाका, विजय हजारे ट्रॉफीत एकट्याने निम्मा संघ माघारी धाडला

एस.श्रीशांतनं केरळच्या संघाकडून खेळताना यूपीच्या संघाचे 5 फलंदाज बाद केले. (S Sreesanth takes five wicket)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:44 PM, 23 Feb 2021
7 वर्षांनी मैदानात उतरलेल्या श्रीशांतचा धमाका, विजय हजारे ट्रॉफीत एकट्याने निम्मा संघ माघारी धाडला
एस.श्रीशांत

नवी दिल्ली : भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतनं (S Sreesanth) विजय हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. श्रीशांतची कामगिरी आणि केरळच्या फलंदाजांची बॅटिंगच्या जोरावर केरळनं स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला. श्रीशांतनं 65 धावांच्या मोबदल्यात यूपीच्या संघाच्या 5 विकेट घेत केरळच्या विजयाचा पाया रचला. केरळनं या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. ( S Sreesanth takes five wicket for Kerala in Vijay Hazare Trophy)

65 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट

बीसीसीआयनं आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातल्यानंतर तब्बल 7 वर्षानंतर श्रीशांतनं क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तब्बल 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर श्रीशांत पाऊल ठेवलं असून तो 2013 नंतर केरळसाठी खेळत आहे. 37 वर्षीय श्रीशांतनं एका सामन्यात 5 विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यानं 2006 मध्ये इंग्लंडविरोधातील सामन्यात 55 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट घेतल्या होत्या. यूपीच्या संघासाठी अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंना श्रीशांतनं बाद केले आहे. यूपीचा सलामीवीर अभिषेक गोस्वामी आणि मधल्या फळीतील फलंदाज अक्षदीप नाथ, भुवनेश्वर कुमार यांच्यासह दोन फलंदाजांना त्यानं बाद केले. श्रीशांतनं त्यांच्या गोलंदाजीवर 65 धावा देत 5 विकेट घेतल्या.

विजय हजारे स्पर्धेत केरळचा दुसरा विजय

उत्तर प्रदेशच्या संघानं केरळसमोर विजयासाठी 283 धावांचं आव्हान ठेवले होते. रॉबिन उत्थाप्पाच्या 85 धावा आणि सचिन बेबी याच्या 76 धावांच्या जोरावर केरळनं 3 विकेटनं विजय मिळवला. केरळची सुरुवात निराशाजनक झाली होती मात्र, रॉबिन उत्थाप्पा आणि संजू सॅमसनच्या 104 धावांच्या भागिदारीनं केरळचा डाव सावरला.

श्रीशांतची क्रिकेट कारकीर्द

आपल्या कारकीर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 169 विकेट घेतल्या असून एकदिवसीय सामन्यात 87 बळी तर कसोटी क्रिकेटमध्ये 75 बॅट्समनना त्याने आऊट केलंय. त्याची यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड झाली होती.


संबंधित बातम्या:

श्रीशांत इज बॅक… 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार!

मोहम्मद शमीच्या निशाण्यावर कांगारु, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत शमीवर मोठी जबाबदारी

( S Sreesanth takes five wicket for Kerala in Vijay Hazare Trophy)