5

श्रीशांत इज बॅक… 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार!

भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतचं (S Sreesanth) क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. तब्बल 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर श्रीशांत पाऊल ठेवणार आहे.

श्रीशांत इज बॅक... 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार!
एस.श्रीशांत
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 6:37 PM

नवी दिल्ली : भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतचं (S Sreesanth) क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. तब्बल 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर श्रीशांत पाऊल ठेवणार आहे. बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली करंडक (Sayyed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसाठी श्रीशांतची केरळ (kerala) संघात निवड करण्यात आली आहे. (Sreesanth play For Syed Mushtaq Ali trophy)

केरळ क्रिकेट असोसिएशनने (kerala Cricket Association) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी 26 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची निवड केली असून त्यात श्रीशांतच्या नावाचाही समावेश केला आहे. ही स्पर्धा 10 जानेवारी 2021 पासून खेळवली जाणार आहे.

बीसीसीआयने श्रीशांतवर 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घातली होती. ही बंदी या वर्षी संपली आहे. श्रीशांतने याबद्दलची माहिती ट्विट करुन दिली आहे. डोमेस्टिक क्रिकेट खेळून भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी आशा श्रीशांतने व्यक्त केली आहे. यंदाचा 2023 चा वर्ल्ड कप खेळण्याची माझी खूप इच्छा आहे. त्यासाठी मी जीवापाड मेहनत करतोय, अशी माहितीही श्रीशांतने दिली.

बंदीअगोदर श्रीशांतचा गोलंदाजीत एकप्रकारचा दबदबा होता. श्रीशांतची सर्वोत्कृष्ट भारतीय गोलंदाज म्हणून गणना केली जाई. परंतु फिक्सिंगनंतर त्याची कारकीर्द डळमळीत झाली.

श्रीशांतची क्रिकेट कारकीर्द

आपल्या कारकीर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 169 विकेट घेतल्या असून एकदिवसीय सामन्यात 87 बळी तर कसोटी क्रिकेटमध्ये 75 बॅट्समनना त्याने आऊट केलंय.

सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैनासारखे दिग्गज खेळाडू देखील खेळताना दिसणार आहे. युवी पंजाब संघाकडून खेळणार आहे, तर रैना यंदाच्या स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार आहे. यासाठी युवी आणि रैना सराव सामन्यात गुंतले आहेत.

संबंधित बातम्या

मोहम्मद शमीच्या निशाण्यावर कांगारु, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत शमीवर मोठी जबाबदारी

विराट कोहलीने वापरलेली आलिशान ऑडी बे’कार’ अवस्थेत

IND vs AUS : पंतची हिंटिंग की साहाची कीपिंग? कप्तान कोहली कोणाची निवड करणार?

Non Stop LIVE Update
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित