AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP BMC Election 2026 : आपापली बॅग भरून ठेवा, ते 17 तारखेची सकाळ मुंबईत बघणार नाहीत, भाजप आमदाराचा मोठा इशारा

" BJP BMC Election 2026 : "अभिमानाने आम्ही सांगतो.जर या वॉर्ड क्रमांक 26 मध्ये कोणी आमच्या माता बहिणींकडे चुकीच्या हेतूने पाहत असेल तर मला सांगा.संजय राजाराम राऊत आणि ठाकरे यांची मुलाखत उद्या सामनामध्ये प्रसारित होईल. हे सर्व संध्याकाळी ७:३० नंतरचे आहेत" अशी टीका नितेश राणे यांनी केली.

BJP BMC Election 2026 : आपापली बॅग भरून ठेवा, ते 17 तारखेची सकाळ मुंबईत बघणार नाहीत, भाजप आमदाराचा  मोठा इशारा
BJP Flag
| Updated on: Jan 08, 2026 | 12:32 PM
Share

“मी काही सर्व मुस्लिम समाजाच्या विरोधात कधीच नव्हतो, आत्ताही नाही. राष्ट्रवादी विचारांचा मुस्लिम समाज आमच्याबरोबर आहे आणि आमच्या हक्काचा आहे. त्यांच्यासोबत नितेश राणे कायम उभा आहे. पण ज्यांना कोणाला ठोकायचं आहे, ते मला चांगलं माहिती आहे. म्हणूनच सांगतोय 15 तारीख याद राखा, आपापली बॅग भरून ठेवा. 15 तारखेनंतर एकही बांग्लादेशी, रोहिंग्यांना इथं राहू देणार नाही. हीच उघडपणे धमकी देऊन जातोय. 16 तारखेनंतर एकाही बांग्लादेशी रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही” कांदिवलीच्या सभेत नितेश राणे यांचं मोठं विधान. “आमच्या प्रवीण दरेकर साहेबांच्या आग्रहाने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलों. या भागात आमचे गाववाले खूप राहतात हे असं ऐकून मनापासून बरं वाटलं. प्रीती ताई स्वतः रडू नकोस, दुसऱ्याला रडव.हफ्त्याची मागणी करणाऱ्यांची जबाबदारी आमच्यावर सोपवा, तुम्ही विकासावर लक्ष केंद्रित करा. काही हिंदू मतांमध्ये हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम काही लोक करत आहेत. घरामध्ये एवढी मोठी घटना झाली तरी लोकांची सेवा करायची आहे” असं नितेश राणे म्हणाले.

पीयूष गोयल साहेब खासदार म्हणून चांगली काम करतायत, सेवा करतायत. आमच्या कोकणाचे लोक इथे आहेत, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे. आमच्या जनतेने राणे साहेबांसारखा माजी मुख्यमंत्री तिथे खासदार बनवला. बघा कोकणाचा आणि सिंधुदुर्गाचा विकास कसा होतो” असं नितेश राणे म्हणाले. “जर कोणी मोठ्या गोष्टीबद्दल बोलायला आले तर त्याला सांगा की सर्व काही ठीक आहे. पण मुख्यमंत्री आमच्या भाजपचा आहे.जर तुम्ही दुसऱ्याला नगरसेवक बनवले आणि तो 17 तारखेनंतर कामासाठी तुम्ही म्हणाल की ते फक्त दरेकर साहेबच करतील. ठाकरे म्हणतात की सर्वांना मराठी येत असले पाहिजे. उत्तर भारतीय लोगों से कहूंगा अगर आपके पास वह आए तो आप कहना हम तो मराठी बोलते है. पहले आप बेहराम पाडा में जाकर पहले सिखाओ” असं नितेश राणे म्हणाले.

17 तारखेची सकाळ तुम्ही मुंबईत बघणार नाही

“देशभक्त मुस्लिम आमच्यासोबत आहेत. मुंबईमध्ये आपल्याला घाण नको. मुंबई मुंबईकरांची आहे. आमच्या हिंदू समाजाची आहे. आमच्या राष्ट्रभक्त लोकांची आहे. अकोट मधील युती चालणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे. मालवणीत हिरवे साप वळवळताय ते कमी होतील. कुठल्याही जिहाद्याला येथे ठेवणार नाही. 17 तारखेची सकाळ तुम्ही मुंबईत बघणार नाही. 16 जानेवारीला आम्ही जल्लोष करणार आहोत. रोहींगे मुस्लिम जिहादी आहेत. 16 तारखेला I love महादेव वाला महापौर बसवणार आहोत. 17 तारखेला त्यांच्यासाठी डेडलाईन असणार आहे” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला.
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान.
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात.
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....